lovers 
विदर्भ

वो मेरी है! उससे शादी करेगा, तो ऍसिड फेक दुंगा... दिली त्याने धमकी

संतोष ताकपिरे

अमरावती : कुणी कुणाशी लग्न करावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. परंतु तू माझी होणार नसशील तर दुसऱ्याची होऊ नये, यासाठी तिच्या होणाऱ्या पतीला धमकी देऊन त्याने लग्न मोडले. लग्न केले तर तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून चेहरा विद्रूप करेल, अशी धमकीसुद्धा त्याने दिली. पोलिसांनी धमकी देणाऱ्या टवाळखोराविरुद्ध शनिवारी (ता. 25) गुन्हा दाखल केला. 

मोहंमद अबरार (वय 28, रा. अमरावती) याची संबंधित युवतीसोबत ओळख होती. तो नेहमी रस्त्यात अडवून युवतीला माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून तिचा छळ करीत होता. पीडितेने सततच्या त्रासाबद्दलची माहिती आपल्या भावाला त्याचवेळी दिली. भावाने मो. अबरार याची समजूत काढली. भविष्यात त्रास देणार नाही, असे आश्‍वासन त्याने पीडितेच्या भावास दिले. या कालावधीत 26 वर्षीय युवती बंगळूरला नोकरीसाठी गेली. मो. अबरारला पुन्हा तिची आठवण झाली. त्याने नवीन मोबाईल क्रमांकावरून तिच्यासोबत संपर्क साधणे सुरू केले. न बोलल्यास स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करून घेईल, अशी धमकी त्याने दिली. पीडित युवती ही धमकीला घाबरून पुन्हा मो. अबरारसोबत बोलू लागली. या कालावधीत युवतीचे लग्न एका युवकासोबत जुळले. 

ती दोन महिन्यांपूर्वी अमरावतीत आली. त्याने पुन्हा तिच्याशी संपर्क साधून लग्न करण्याचा आग्रह धरला. तिने स्वत:चे लग्न ठरल्याची जाणीव मो. अबरारला करून दिली. मात्र, त्याने तिच्या होणाऱ्या पतीसोबत संपर्क साधून आपले त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत प्रेमप्रकरण असल्याचे सांगितले. लग्न केल्यास तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून चेहरा विद्रूप करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे तिचे लग्न मोडले. अखेर पीडितेने शनिवारी (ता. 25) फ्रेजरपुरा ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी मोहंमद अबरार विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

घटनाक्रम महिला अत्याचाराशी संबंधित असल्याने पीडितेच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. 
-पुंडलिक मेश्राम, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.  
 

संपादन - राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT