esakal | अमरावतीत हे चाललंय काय! पोलिसच पोलिसांपासून नाही सुरक्षित; उघडकीस आली 'ही' धक्कादायक घटना..     
sakal

बोलून बातमी शोधा

police in amravati forcefully behaved with woman police constable read full story

अमरावतीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे आता पोलिसच पोलिसांपासून सुरक्षित नाही का हाच प्रश्न उपस्थित होतोय. अमरावतीत कार्यरत असलेल्या एका पोलिसानेच एक धक्कादायक कृत्य केले आहे.   

अमरावतीत हे चाललंय काय! पोलिसच पोलिसांपासून नाही सुरक्षित; उघडकीस आली 'ही' धक्कादायक घटना..     

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती:  'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य असलेले पोलिस सतत झटून आपल्या सर्वांचे रक्षण करत असतात. सामान्य नागरिकांच्या  सेवेसाठो आणि रक्षणासाठी सतत तत्पर असलेले पोलिस आपले कर्तव्य चोखपणे पार पडत असतात. मात्र अमरावतीत पोलिसांच्या या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 

अमरावतीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे आता पोलिसच पोलिसांपासून सुरक्षित नाही का हाच प्रश्न उपस्थित होतोय. अमरावतीत कार्यरत असलेल्या एका पोलिसानेच एक धक्कादायक कृत्य केले आहे.   

हेही वाचा - आम्हालाच सततच्या बत्तीगूलची शिक्षा का? नागपूरच्या 'या' भागातील नागरिकांचा संतप्त सवाल...

मुकेश यादव (वय 30) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो सध्या मुख्यालयात कार्यरत आहे. मुकेश विवाहित आहे. तरीही मुकेश पोलिस दलातील वेगळ्या विभागात कार्यरत असेलल्या एका महिलेच्या प्रेमात पडला. मात्र यानंतर जे घडले  ते धक्कादायक होते. 

दाखवले लग्नाचे आमिष

शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या युवतीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमीष दाखवून तिचे अपहरण केले. काही दिवस ते सोबत राहिले. त्यानंतर त्यांनी तपोवन परिसरात एक घर विकत घेतले. त्या घरात ते दोघे राहायला सुद्धा गेले. मुकेशने घर विकत घेण्यासाठी संबंधित महिलेकडून दहा लाख रुपये घेतले. ही रक्कम तिने कर्ज काढून जमवली होती. तिच्याजवळ असलेले लाखो रुपयांचे दागिनेही तिला विश्‍वासात घेऊन घरासाठी मुकेशने घेतले.  

महिला पोलिसावर केला अत्याचार

पैसे आणि दागिने मिळवण्यासाठी मुकेशने महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्याचबरोबर तिचे अपहरण केले. पीडित युवती मध्यंतरी खासगी रुग्णालयात दाखल असताना, तिचा भाऊ व आईचे यादव सोबत भांडणही झाले होते, अशीही  माहिती समोर आली आहे. पीडित महिलेने नोंदवलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

वाचा सविस्तर - ना पक्का रस्ता ना वीज; 'या' गावात मॉडर्न भारत अजून पोहोचलेलाच नाही..काय आहे कारण? वाचा सविस्तर

लवकरच कारवाई करण्यात येईल
पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस शिपाई मुकेश यादव घरी दिसून आला नाही. लवकरच त्याच्या अटकेची कारवाई केल्या जाईल. 
- मनीष ठाकरे, 
पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे. 
 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image