khedekar
khedekar 
विदर्भ

शिवस्मारक जमिनीवरच असावे : पुरुषोत्तम खेडेकर

सकाळवृत्तसेवा

चिखली : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सर्व राजकीय पक्षांचे राजकारण आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक करण्यासाठी आपण अनावश्यक स्पर्धा करीत आहोत. जगातील सर्वात उंच असणारे शिवस्मारक असावे ही सामान्य शिवप्रेमी, आबालवृध्द मंडळीस भावनिक करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती आहे. शिवस्मारक जमिनीवरच असावे ही मराठा सेवा संघाची सन 1995 पासून मागणी आहे. माजी मुख्यमंत्री डॉ.मनोहर जोशी यांचेकडे झालेल्या बैठकीत तसे लेखी निवेदन दिले होते. त्यासाठी गोराई कांदिवली मुंबई भागातील सुमारे 300 हेक्टर जमीन आम्ही सुचविलेली होती. पुढे आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने दहा वर्षे साधी भेट दिली नाही असे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी जिजाऊ परीवारातील मित्रांना उद्देशून निवेदन केले आहे.

अचानक त्याच सरकारने अरबी समुद्रात शिवस्मारक करण्याची व मराठा आरक्षण देण्याची राजकीय घोषणा केली होती. त्यावेळीही आमचा व शासनाचा वाद झाला होता. शिवस्मारक मुंबई परिसरातील आजच्या राजभवन मलबार हिल येथे उभे करावे अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. समुद्रात शिवस्मारक करण्याची घोषणा मागे घेणे गरजेचे आहे. कालचा अपघातही यासाठी भरपूर आहे.

शिवस्मारक राजभवन मुंबई परिसरातील जमिनीवर उभे केल्यास बारा महिने चोवीस तास उघडे राहू शकते. परिणामी शिवप्रेमी मंडळीस जास्त वेळ मिळेल. शिवस्मारक समुद्रात उभे केल्यास अनुभव पाहता दरवर्षी सुमारे 4 ते 5 महिने समुद्रात निर्माण होणारे लाटांचे वादळ यामुळे बंद करावे लागेल. म्हणजेच वेळ कमी पडेल. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क अमेरिका येथे हा त्रास आहे. समुद्रात शिवस्मारक उभे केल्यास दरोज दरमाणशी खूप खर्च येईल. सुरूवात एक हजार रूपये राहू शकतो व टोल सारखे वाढत  राहील. वेळ 4-5 तासच मिळेल.समुद्रात शिवस्मारक उभे करण्यासाठी अनेक मर्यादा व अडचणी आहेत. सर्वात मोठी अडचण जागा. मर्यादित जागा भरती करून कृत्रिम बेट तयार करत असतांना त्याची साईज लहान असणार. म्हणजे एकावेळी मर्यादित लोक तेथे जावू शकतात. परिणामी खर्च खूप होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी एका बोटीचा अपघातही झाला. शिवस्मारक समुद्रात उभे केल्यास दररोज असे प्रकार घडू शकतात. याशिवाय इतर अडचणी आहेत. स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारी येथील नावाडी वाद जगजाहीर आहे. आम्ही 

नियोजन करतो तसे घडत नाही, हे सत्य आहे.शिवस्मारक समुद्रात उभे केल्यास शिवप्रेमी मंडळीस सर्व चहा, पाणी, खाद्य पदार्थ तेथेच मल्टिप्लेक्स सारखे जास्त पैसे दूवन घेणे भाग पडेल. शिवस्मारक समुद्रात उभे केल्यास त्याची नियमित देखभाल खूप-खूप खर्चिक राहील. धातू व बांधकाम गंजत राहील. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य लोकांना समुद्रात शिवस्मारक उभे केल्यास एवढे पैसे खर्च करून भेट देणे शक्य होणार नाही. म्हणजेच मावळे शिवस्मारक समुद्रात उभे केल्यास महाराजांचे दर्शन घेवू शकणार नाहीत.

शिवस्मारक समुद्रात उभे केल्यास येणारा खर्च खूप मोठा राहील. आता जाहीर केलेले तीन हजार कोटी रूपये फक्त भरणीत संपतील. पुढे कदाचित शिवस्मारक समुद्रात अर्धवट उभे राहू शकते. तसेच झाल्यास मुद्दा गंभीरपणे हाताळणे जमणार नाही. प्रस्तावित शिवस्मारक मुंबई येथील राजभवन येथे उभारावे असे वाटते. मुद्दा भावनिक न बनवता व्यावहारिक उपाय आहे. स्मारक जमिनीवरील असल्यास दररोज सकाळी 8 ते रात्री 8 उघडे राहू शकते. तिकिट दर 5-10 रूपये वा मोफत असू शकतात. सामान्य ग्रामीण कष्टकरी, शेतमजुर, हमाल, श्रमकरी, शेतकरी शिवप्रेमी मंडळीस सहज शिवस्मारक मुंबई पाहता येईल. स्थानिक सामान्य लोकांना रोजगार मिळेल. मासेमारी करणारे कोळी बांधव खूप आनंददायी होतील. असे अगणित फायदे शिवस्मारक मुंबई राजभवन येथे उभे केल्यास होणार आहेत, असे निवेदनात पुरूषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT