विदर्भ

Gondia Viral News : "प्रेयसीसाठी शोले स्टाइलने गांधीगिरी, 'तो' चढला टॉवरवर" पोलिसांच्या कल्पकतेने वाचले प्राण..

सकाळ वृत्तसेवा

देवरी (जि. गोंदिया) - प्रेयसीसाठी शोले स्टाइलने ३०० फूट मोबाईल टॉवरवर चढून गांधीगिरी करणाऱ्या दीपककुमार रेनसिंह सलामे (वय २४, रा. खामखुरा) या प्रियकराला चिचगड पोलिसांनी मोठ्या शिताफीने खाली उतरवले. हा प्रकार मंगळवारी (ता. २१) सकाळी खामखुरा येथे घडला. दीपककुमारने छत्तीसगड राज्यातील तरुणीने लग्नासाठी नकार दिल्याने नैराश्यातून जीव देण्याच्या तयारीने हे पाऊल उचलले.

या घटनेची माहिती स्थानिकांनी चिचगड पोलिसांना दिली. ठाणेदार शरद पाटील व त्यांच्या टीमने तत्काळ घटनास्थळी पोहोचत त्या तरुणाशी मोबाइलद्वारे संपर्क साधला. त्याच्या मनधरणीचे सलग चार तास प्रयत्न केले. पण तो तरुण काही एक ऐकत नव्हता.

शेवटी हे प्रकरण ठाणेदार शरद पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या तरुणाचे प्राण वाचवायचे ठरवून त्याला सतत मोबाइलवर बोलण्यात व्यस्त ठेवले. त्याला विश्वासात घेऊन इतर आवश्यक असलेल्या वस्तू जागेवर त्वरित उपलब्ध केल्या. सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांच्या मदतीने त्या तरुणाला अवघ्या ४ तासात सुखरूप खाली उतरविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT