accident
accident sakal
विदर्भ

Accident : मोटार अपघातात सहा जण मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा

काटोल (जि. नागपूर) - भरधाव ट्रकच्या धडकेत मोटारीचा चुराडा होऊन सहा जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोनखांब व ताराबोडी दरम्यान शुक्रवारी रात्री घडली. मृत काटोल तालुक्यातील मेंढपठार येथील एकाच गावचे रहिवासी असून, ते नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीच्या लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून घरी परतत होते.

मयूर मोरेश्वर इंगळे (वय २२), विठ्ठल थोटे (वय ४२), अजय दशरथ चिखले (वय ४०), वैभव चिखले (वय ३०), रमेश ओमकार हेलोंडे (वय ५३), सुधाकर रामचंद्र मानकर (वय ५२) हे यामध्ये मृत्युमुखी पडले, तर माजी सरपंच जगदीश ढोणे (वय ४५) हे यामध्ये गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांसह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. सहाही मृतांवर शनिवारी मेंढपठार येथे एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Attack: 5-6 गोळ्या चालवायचे थांबायचे अन् पुन्हा...; जम्मू बस अटॅकमध्ये जखमींनी सांगितली आपबिती

Ind vs Pak : सामन्यात टळली मोठी दुर्घटना! सिराजच्या 'त्या' बॉलवर थोडक्यात वाचला मोहम्मद रिझवान; डोक्यात...

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर

Sonakshi Sinha Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांची लेक 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; सोनाक्षीच्या लव्हस्टोरीसाठी सलमान कारणीभूत

IRCTC Password Recovery : IRCTC पासवर्ड विसरलात? चिंता करू नका, 'या' दोन सोप्या मार्गांनी करा रिकव्हर

SCROLL FOR NEXT