smugglers are smuggling wine from water bottles  
विदर्भ

तस्करांची अजब शक्कल! पेयजलाच्या बाटल्यांमधून मोहाच्या दारूची सर्रास तस्करी

मिलिंद उमरे

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली, तरी मोठ्या प्रमाणात दारू तस्करी व विक्री होते. काळानुरूप या गुन्ह्याचे स्वरूप बदलत असून दारूतस्करी करणारे तस्करही या गुन्ह्यासाठी नवनवीन शक्‍कल लढवत आहेत. कुणाला संशय येऊ नये म्हणून आता थंड पेयजलाच्या प्लास्टिकच्या बाटलीत मोहाची पारदर्शक दारू भरून त्याची तस्करी करण्यात येत आहे. असाच एका तस्करीचा भन्नाट प्रकार विश्रामपूर- बोदली मार्गावर उघडकीस आला.

पेयजलाच्या बाटलीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीचा पाठलाग करून दोन दारूविक्रेत्यांकडून 25 लिटर मोहफुलाची दारू व दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी अशोक कुकुडकर रा. बोदली, हरिदास भुरसे रा. ठाणेगाव, या दोघांवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या केली आहे. 

विश्रामपूर-बोदली मार्गावरून संशयितरीत्या दुचाकी वाहन जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्या दुचाकीचा पाठलाग करून त्यांच्याकडील मालाची तपासणी केली. यावेळी पाण्याच्या बाटलीतून दारूची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. अशोक कुकुडकर व हरिदास भुरसे या दोघांकडून 5 हजार रुपये किंमतीची मोहफुलाची दारू व 40 हजार रुपये किंमतीचे दुचाकी वाहन, असा एकूण 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

ही दारू बोदली येथे विक्रीसाठी आणत असल्याची माहीती दारूविक्रेत्यांनी दिली. याप्रकरणी दोघांवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात बिट अंमलदार प्रभाकर भेंडारे, शकील सय्यद, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.

विहीरगावात सात जणांवर गुन्हा दाखल

देसाईगंज तालुक्‍यातील विहीरगाव येथील सात दारूविक्रेत्यांच्या घरी धाडी टाकून एक क्विंटल मोहसडवा नष्ट व नवी शक्कल लढवीत फिल्मी स्टाईलने लपवून ठेवलेली 25 हजार रुपये किंमतीची तीन पेटी देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी देसाईगंज पोलिस ठाण्यात सात दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई देसाईगंज पोलिस, मुक्तिपथ व गाव संघटनेने संयुक्तरीत्या केली आहे. गावातील सात दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान एकूण 1 क्विंटल मोहसडवा नष्ट करण्यात आला. दारूविक्रेत्यांनी नवी शक्कल लढवीत फिल्मी स्टाईलने लपवून ठेवलेली 25 हजार रुपये किंमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधिकारी बावनकर, पोलिस कर्मचारी, मुक्तिपथ तालुका चमूने केली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT