esakal | Maharashtra Budget 2021 : गोसेखुर्दसाठी एक हजार कोटी

बोलून बातमी शोधा

Maharashtra Budget 2021 : गोसेखुर्दसाठी एक हजार कोटी}

एक महिन्यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसेखुर्दच्या कामाचा आढावा घेण्यासाठी भंडारा जिल्ह्याला भेट दिली होती. यावेळी त्यांंनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल होते. आजच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी गोसेखुर्दसाठी एक हजार कोटींची घोषणा केली.

Maharashtra Budget 2021 : गोसेखुर्दसाठी एक हजार कोटी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : महाविकासआघाडीचा दुसरा अर्थसंपल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सादर केला. अजित पवार यांनी विदर्भातील अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासह गोसेखुर्दसाठी एक हजार कोटींची घोषणा केली.

पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हा प्रयत्न आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी एक हजार कोटींची घोषणा केली. आतापर्यंत अनेकवेळा कालमर्यादा वाढल्या आहेत. धरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा राज्यकर्ते व विदर्भ सिंचन विकास महामंडळाकडून करण्यात येतो. चार वर्षांपूर्वी गोसेखुर्द प्रकल्पाची किंमत १८ हजार ११० कोटी रुपये झाली. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप अपेक्षित लाभ मिळालेला नाही.

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात गोसेखुर्दला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. सरकारने दर्जा दिल्यानंतर प्रकल्पाच्या कामातील अनियमिततांमुळे सरकारने निधी देणे बंद केले. २०१२ सालापासून प्रकल्पाला ग्रहण लागले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनियमिततांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू केली.

Maharashtra Budget 2021 : अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

मनुष्यबळाअभावी कासव गतीने चौकशी सुरू आहे. तथापि, त्याचा फटका कामांना बसला. अधिकाऱ्यांचे मनोबल खचले आणि कंत्राटदारांनीदेखील कामांसाठी फारशी उत्सुकता दाखवली नाही. सरकारने निविदा रद्द केल्याचा फटकाही बसला. केंद्राने आता डिसेंबर २०२१ सालापर्यंत कालमर्यादा निश्चित केली आहे.

एक महिन्यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसेखुर्दच्या कामाचा आढावा घेण्यासाठी भंडारा जिल्ह्याला भेट दिली होती. यावेळी त्यांंनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल होते. आजच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी गोसेखुर्दसाठी एक हजार कोटींची घोषणा केली.