esakal | चित्रा वाघ यांची बदनामी : मुंबई पोलिसांनी यवतमाळात केली एकाला अटक

बोलून बातमी शोधा

One arrested for defaming Chitra Wagh Yavatmal crime news}

राहुल आडे व संतोष राठोड (रा. भांबोरा, ता. घाटंजी) या तरुणांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट समाजमाध्यमांवर टाकून वाघ यांना भ्रमणध्वनीवर कॉल करून धमकी दिल्याचा आरोप आहे.

vidarbha
चित्रा वाघ यांची बदनामी : मुंबई पोलिसांनी यवतमाळात केली एकाला अटक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटंजी (जि. यवतमाळ) : टीकटॉक स्टार पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमकपणे हे प्रकरण लाऊन धरले. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. दुसरीकडे चित्रा वाघ यांनी समाजाची बदनामी केली, या आरोपावरून त्यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्याचा सपाटा सुरू झाला. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रॅंचच्या सायबर सेलने घाटंजी तालुक्‍यातून एका तरुणास ताब्यात घेतले.

राहुल तुळशीराम आडे (रा. जरंग, ता. घाटंजी) असे तरुणाचे नाव आहे. याच तालुक्‍यातील अन्य एक संशयित फरार असून, मुंबई पोलिस त्याचा शोध घेत आहे. चित्रा वाघ यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची दखल घेत वाघ यांची बदनामी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.

अधिक माहितीसाठी - ‘आई तुझ्याशी शेवटचे बोलायचे... मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तुझा आवाज मला ऐकायचा आहे...’

राहुल आडे व संतोष राठोड (रा. भांबोरा, ता. घाटंजी) या तरुणांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट समाजमाध्यमांवर टाकून वाघ यांना भ्रमणध्वनीवर कॉल करून धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा नोंदविला. मुंबई क्राईम ब्रॅंच सायबर सेलचे पोलिस निरीक्षक प्रमोद कोठेकर यांच्या नेतृत्वातील पथकाने पांढरकवडा पोलिस ठाण्यांतर्गत जरंग येथे कारवाई करून राहुल आडे या तरुणास ताब्यात घेतले. संतोष राठोड याचा पोलिस शोध घेत आहे.