Son murders father in domestic dispute Gadchiroli crime news 
विदर्भ

‘मला अंत्ययात्रेला का जाऊ दिले नाही’ असे वडिलांनी विचारल्याने चिडलेल्या मुलाने केला खून

सकाळ डिजिटल टीम

धानोरा (जि. गडचिरोली) : अंत्ययात्रेला का जाऊ दिले नाही, असे म्हणून भांडण करीत मुलावर शस्त्राने वार करणाऱ्या वडिलांचा मुलाने त्याच शस्त्राने गळा कापून खून केला. ही घटना शनिवार (ता. २०) रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्‍यातील लेखाटोला येथे घडली. मृताचे नाव मनिराम बाजू पदा (वय ५३) असून, आरोपीचे नाव अक्षय मनिराम पदा (वय २२) आहे.

प्राप्त माहितीनुसार, वडील मनिराम पदा याने मुलगा अक्षय पदा याला ‘मला कोंदावाही येथे अंत्ययात्रेला का जाऊ दिले नाही’, असे विचारत भांडण केले. वाद वाढत असताना मनिरामने लोखंडी बरचीने मुलगा अक्षय याच्या पोटावर वार केला. यात तो जखमी झाला.

चिडलेल्या अक्षयने वडिलांच्या हातातून बरची हिसकावून मागून पकडून त्याच बरचीने गळा चिरून खून केला. याप्रकरणी आरोपीचा भाऊ सागर मनिराम पदा याच्या तक्रारीवरून धानोरा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास धानोरा पोलिस करीत आहेत.

कोच्छी येथे युवकाची आत्महत्या

मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील कोच्छी/दांडेगाव येथे घडली. मृताचे नाव राजकुमार मनोहर सेलोटे (वय ३३) असे आहे. गावातील ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या विहिरीत शनिवारी मध्यरात्री राजकुमारने उडी घेतली होती. याबाबत लाखांदूर पोलिसांनी नोंद केली असून आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.

चांदपूरच्या कालव्यात मृतदेह आढळला

भंडारा जिल्ह्यातील चांदपूर जलाशयाच्या मुख्य कालव्यात रविवारी सकाळी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृताचे नाव प्रकाश कटरे (वय ५०) असून तो चिचोली/बघेडा येथील रहिवासी आहे. चांदपूर जलाशयाच्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी वितरित करणे सुरू आहे. प्रकाश कटरे हा घरून आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तुमसर पोलिसांनी दाखल केली आहे. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना रविवारी सकाळी चांदपूर जलाशयाच्या मुख्य कालव्यात मृतदेह तरंगताना दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Police Inspector : जत पोलिस निरिक्षकांवर कारवाई होणार, १४ वर्षाच्या मुलाचा गोळ्या घालून खून; कुख्यात गुंडाने पोलिसांसमोरच पिस्तूलने दहशत माजवली

Koyna Dam Water Level : महाराष्ट्रावर 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळाचे सावट? सर्वात मोठ्या कोयना धरणात उरला फक्त 15 दिवस पुरेल इतकाच साठा, पाहा काय आहे स्थिती

Realme P4R 5G स्मार्टफोन झाला लाँच! चक्क 8000mAh बॅटरीसह कमाल फीचर्स, किंमत फक्त...

IND vs AFG 1st ODI: पावसाचा खोडा... भारत-अफगाणिस्तान मॅच केव्हा सुरू होणार? BCCI ने दिले अपडेट्स; सामना रद्द होणार?

Navi Mumbai Electricity: अंधारात बुडालं खारघर, हजारो कुटुंबाचे हाल; अचानक वीज गेल्यानं लिफ्टमध्ये अडकले तरुण तरुणी

SCROLL FOR NEXT