विदर्भ

उपनिरीक्षकपदाचा वाद; नापासांना संधी, उत्तीर्णला ‘वेटिंग’

सकाळवृत्तसेवा

नागपूर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना पोलिस उपनिरीक्षकपदावर नियुक्‍ती देण्यासाठी ‘वेटिंग’वर ठेवण्यात आले. तर परीक्षेत नापास झालेल्यांना पीएसआयपदी नियुक्‍ती देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिस महासंचालक कार्यालयातील काही ‘बाबूं’नी ‘सेटिंग’ केल्याची चर्चा असल्याने उमेदवारांमध्ये रोष आहे. 

लोकसेवा आयोगाने २०१३ ला घेतलेल्या परीक्षेत नागपूर परिक्षेत्रासह २ हजार २२२ पोलिस कर्मचारी उत्तीर्ण झाले होते. पोलिस कर्मचारी ते थेट पोलिस अधिकारी होण्याची संधी त्यांना मिळाली होती. यामध्ये शहर पोलिस दलातील ३९४ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, गेल्या २०१३ पासून केवळ २ हजार कर्मचाऱ्यांनाच पोलिस उपनिरीक्षकपद बहाल करण्यात आले होते. उर्वरित पोलिस कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत पीएसआय म्हणून नियुक्‍ती देण्यात आली नव्हती. शेवटी उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. तब्बल ३३ तारखा झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने पीएसआय पदे भरण्याचे न्यायालयाने बजावले होते. पोलिस महासंचालकांनीही घटकप्रमुखांना आदेशित यादी दुरुस्त करण्यास सांगितले होते. परंतु, उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना अद्यापर्यंत पीएसआय पदे देण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

पोलिस दलात खदखद 
पोलिस दलात अर्हता परीक्षा उत्तीर्ण पोलिस कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षकपदावर रुजू करून घेण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालय टाळाटाळ करीत आहे. तर नापास उमेदवारांना पीएसआयपदाची बहाली देत आहे. पीएसआयपदाचा वाद मार्गी लावण्यासाठी जवळपास १२ हजार कर्मचारी एकवटले आहे. पोलिस दलात केव्हाही उद्रेक होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मॅटमध्ये जाण्याची तयारी
नाशिक पोलिस दलात असलेल्या पोलिस कर्मचारी शीला कोरडवाल हा अर्हता परीक्षेत १४ गुणांनी नापास झाल्या होत्या. मात्र, पोलिस महासंचालक कार्यालयात ‘सेटिंग’ केल्यामुळे त्यांना उत्तीर्ण करण्यात आले. तसेच पीएसआयपदही बहाल करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे अन्य उत्तीर्ण कर्मचारी मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT