tick.
tick. 
विदर्भ

गडचिरोली जिल्ह्यात सागवानाची तस्करी

मिलिंद उमरे

सिरोंचा(गडचिरोली) : वनकर्मचाऱ्यांनी गस्तीवर असताना सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या पाच बैलबंड्यांसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तिरुपती राजम पुल्लुरी, पोचम दुर्गय्या पुल्लुरी, मलय्या पोचम पुलगंटी, वेंकटी समय्या आईला, तिरुपती पोचम गुंडेटी सर्व रा. नगरम अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्री वनकर्मचारी गस्तीवर असताना बैलबंडीद्वारे सागवान लाकडांची तस्करी होत असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली. वनकर्मचाऱ्यांनी सिरोंचा ते मंडलापूर मार्गावर सापळा रचला असता,तस्कर पाच बैलबंडंयांमधून सागवान लाकडे वाहून नेताना आढळून आले. वनकर्मचाऱ्यांना पाहताच आरोपी अंधाराचा फायदा घेत आजूबाजूच्या शेतात दडून बसले.

वनकर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन बैलबंडीची पाहणी केली असता त्यामध्ये ३४ नग सागवान लाकडे आढळून आली. या मालाचे मोजमाप करून ७१ हजार ९१४ रुपये किमतीचे १.११९ घनमीटर सागवान लाकूड व १ लाख १७ हजार ५०० रुपये किमतीचे बैल व बंडी असा एकूण १ लाख ८९ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचही आरोपींवर वनगुन्ह्याअंतर्गत शनिवारी (ता. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमीतकुमार, सहायक वनसंरक्षक एस. जी. बर्डेकर यांच्या मार्गदर्शनात सिरोंचाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वि. वा. नरखेडकर, क्षेत्र सहायक बी. एम. खोब्रागडे, चिटूरचे क्षेत्र सहायक एस. जे. खरतड, वनरक्षक बी. एम. नरोटे, संरक्षण पथकातील वनपाल दिलीप कौशिक, एस. एस. खोब्रागडे, रामने, वाहनचालक चौधरी यांनी केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नरखेडकर करीत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT