tenth and twelve classes are optional due to corona in amravati 
विदर्भ

कोरोनाचा उद्रेक! दहावी अन् बारावीच्या शाळा होणार बंद? निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांवर

सुधीर भारती

अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत. मात्र, 10 वी तसेच 12 वीच्या शाळा सुरूच ठेवण्यात आल्या.  आता कोरोनाची परिस्थिती पाहता 10 वी व 12 वीच्या शाळांचा निर्णय संबंधित शाळा व्यवस्थापनाने आपल्या स्तरावर घेण्याची मोकळीक जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या एकाच आठवड्यात वाढली असून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे प्रशासन पुरते हादरले आहे. शहरात मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला. मात्र, त्यातून 10 वी तसेच 12 वी वर्ग असलेल्या शाळांना वगळण्यात आले होते. आता कोरोना रुग्णांची सततची वाढती संख्या पाहता 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू करणे अथवा बंद करणे, हा निर्णय संबंधित व्यवस्थापनाला घ्यायचा आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी माहिती दिली. ज्या व्यवस्थापनाला पूर्वीप्रमाणेच ऑनलाइन वर्ग सुरू करता येईल, त्या व्यवस्थापनाने तसेच करावे किंवा ज्यांना ऑफलाइन क्‍लासेस घेणे शक्‍य आहे, तो निर्णय त्यांनी स्वतः घ्यावा. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही वेगळे आदेश राहणार नाहीत. त्यामुळे 10 वी व 12 वीच्या शाळासुद्धा येत्या काही दिवसांत बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तो व्यापाऱ्यांचा निर्णय -
शहरातील काही भागांतील व्यापाऱ्यांनी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच आपली दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रशासनाची याबाबत भूमिका ठाम आहे. आम्ही शहरातील व्यापाराचे वेळापत्रक बदलविण्याच्या मानसिकतेत नाही किंवा दुकानांबाबत कुठलेही वेगळे आदेश नाहीत. कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या खबरदारीच्या उपाययोजना असून त्याचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.     
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT