esakal | डोक्याला मार लागलेली आई विश्‍वासच ठेवायला तयार नव्हती; सतत विचारायची ‘माझा मुलगा सुखरूप आहे नं? मात्र...
sakal

बोलून बातमी शोधा

The death of a child in front of the eyes of the parents Nagpur crime news

दाम्पत्यसुद्धा गंभीर जखमी झाले. प्रफुल्लचा हात मोडला आहे. नागरिकांना दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डोक्याला मार लागलेली आई विश्‍वासच ठेवायला तयार नव्हती; सतत विचारायची ‘माझा मुलगा सुखरूप आहे नं? मात्र...

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : दुचाकीने ट्रिपलसीट लग्नसमारंभाला जाणाऱ्या दाम्पत्याला मागून भरधाव आलेल्या ट्रकने जबर धडक दिली. यात पती-पत्नी आणि पाच वर्षीय मुलगा रस्त्यावर फेकले गेले. ट्रकचे चाक अंगावरून गेल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. हा दुर्दैवी अपघात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता वाठोड्यात झाला. देवांशू प्रफुल्ल शेंडे असे मृत मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल शेंडे हे नंदनवनमधील बीडगाव चौकात राहतात. त्यांना पत्नी मोना (वय २३) आणि मुलगा देवांशू (५) आहे. त्यांच्या नातेवाइकाचे लग्न होते. समारंभासाठी ते पत्नी व मुलासह दुचाकीने सोमवारी सकाळी अकरा वाजता घरून निघाले. बीडगाव चौकातून जात असताना माउली ट्रेडर्ससमोर भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली.

अधिक माहितीसाठी - लग्नाच्या महिनाभरानंतर ‘व्हॅलेंटाइन डे’ला आला वाढदिवस; गिफ्टची वाट पाहत असलेल्या पत्नीचा पतीने केला खून

यात प्रफुल्ल आणि मोना हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर मध्ये बसलेला देवांशू रस्त्यावर फेकला गेला. त्याच्या अंगावरून ट्रकचे मागचे चाक गेले. दाम्पत्यसुद्धा गंभीर जखमी झाले. प्रफुल्लचा हात मोडला आहे. नागरिकांना दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माझा मुलगा सुखरूप आहे नं?

दुचाकीला धडक दिल्यामुळे प्रफुल्ल, मोना आणि मुलगा गंभीर जखमी झाले. डोक्याला मार लागला असतानाही मोनाने मुलाकडे धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने देवांशूचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र, विश्‍वास ठेवायला तयार नव्हती. ‘माझा मुलगा सुखरूप आहे नं?’ अशी ती वारंवार विचारणा करीत होती.

go to top