file photo
file photo 
विदर्भ

रेल्वेत तृतीयपंथींचा उच्छाद 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईत शिथिलता येताच रेल्वेगाड्यांमध्ये तृतीयपंथी सक्रिय झाले आहेत. धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये त्यांचा उच्छाद सुरू आहे. बिदागीच्या नावावर जबरी वसुली करून प्रवाशांना छळत आहेत. जीआरपी आणि आरपीएफकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. 


रेल्वे सुरक्षा दलाने धडक कारवाईद्वारे तृतीयपंथींवर अंकुश मिळविण्यात यश मिळविले होते. परंतु, अलीकडे कारवाईत काहीशी शिथिलता आली. ही बाब तृतीयपंथींच्या पथ्यावर पडली. नागपुरातून रवाना झाल्यानंतर आउटरवर रेल्वेगाड्यांची गती संथ असते. संधी साधून तृतीयपंथी गाडीत डेरेदाखल होतात. त्रिवेंद्रम-गोरखपूर राप्तीसागर एक्‍स्प्रेस, जीटी एक्‍स्प्रेस, आझाद हिंद एक्‍स्प्रेस, हावडा-कुर्ला, हावडा-मुंबई मेल, विदर्भ एक्‍स्प्रेस या गाड्यांमध्ये त्यांची उपस्थिती असतेच असते. अगदी समूहाने प्रवेश केल्यानंतर गाडीने वेग धरताच पैशासाठी बळजबरी सुरू होते. पैसे न देणाऱ्यांना शिव्याशाप ही नित्याचीच बाब झाली आहे. असभ्य हावभाव करीत असल्याने महिला वर्गाला लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. पुढील स्थानकावर पोहोचताना गडीचा वेग कमी होताच ते निघून जातात. अशा प्रसंगाला सामोरे गेलेले मासिक पासधारक प्रवासी कुमार यांनी सांगितले की, गीतांजली एक्‍स्प्रेसमध्ये हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. अलीकडेच त्यांच्यासोबत तृतीयपंथींनी वाद घातला. मदतीसाठी फोन करताच चेनपुलिंग करीत ते पळून गेले. 
दिल्ली मार्गावरील इटारसीपर्यंत, मुंबई मार्गावर बडनेरा तर हावडा मार्गावर गोंदियापर्यंत बहुतेक गाड्यांमध्ये तृतीयपंथी आणि विनापरवानगी फेरीवाले दिसून येतात. प्रवाशांसोबत त्यांचा वाद ही आता सामान्य बाब झाली आहे. रेल्वेगाडीत आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे स्कॉटिंग असले, तरी तृतीयपंथींचा बंदोबस्त होताना दिसत नाही. प्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई होईल, एवढेच नेहमीचे वाक्‍य सांगून संबंधित यंत्रणांचे अधिकारी वेळ मारून नेतात, हीसुद्धा चिंतेची बाब आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT