Three arrested for smuggling scaly cat crime news 
विदर्भ

गुप्तधन, तिलिस्मी औषध शोधण्यासाठी शेतात जमले नागरिक; सोबत होता हा दुर्मिळ प्राणी

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली : चामोर्शी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुदरसी टोला येथील एका घरी धाड टाकून तस्करी करण्यात येणाऱ्या खवले मांजराला ताब्यात घेऊन तिघांना अटक करण्यात आली. परराज्यातील व्यक्तीला खवल्या मांजराची विक्री करणार असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी कुदरसी टोला येथील राजू घोती याच्या घरी जाऊन माहिती घेतली असता तेथे इरफान इनीयास सैफी (रा. धुंगराला, उत्तर प्रदेश) हा आढळून आला. हा आरोपी सध्या गडचिरोली येथील गोकुलनगर येथे राहतो. त्याला यासंदर्भात विचारपूस केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

परंतु, पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने दुर्मिळ असलेल्या खवले मांजराचा गुप्तधन शोधण्यासाठी तसेच तिलिस्मी औषधीसाठी वापर होत असल्याचे सांगितले. या प्राण्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड अंधविश्‍वास असल्याने खवले मांजराची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फार मोठी किंमत मिळत असल्याचेही सांगितले.

इरफानने त्याचा साथीदार शकील बाबू सैफी (रा. सलाई, जि. हापूर, उत्तर प्रदेश) याचेही नाव सांगितले. हा आरोपी सध्या गडचिरोलीतील इंदिरानगर येथे ढोके यांच्या घरी भाड्याने राहतो. या दोघांसह खवल्या मांजर विक्री करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी राजू आंदुलान घोती याच्या घरी आणले. खवले मांजर कुणाला दिसू नये म्हणून गावापासून लांब अंतरावर असलेल्या शेतामध्ये ठेवून त्याची विक्री करण्याचा बेत आखण्यात आला होता.

शकील बाबू सैफी आणि राजू घोती शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्याने रात्री घेरावबंदी करून त्यांना खवले मांजरासह ताब्यात घेतले. त्यानंतर खवले मांजर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT