file Photo
file Photo 
विदर्भ

चक्‍क बारा युवकांनी टाकला मतदानावर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा

कोदामेंढी  (जि.नागपूर) : ईव्हीएम मशीनचा विरोध करीत मतदानावर बहिष्कार केल्याची बातमी पुढे आली आहे. कामठी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मौदा तालुक्‍यातील एक दोन नाही तर चक्क बारा मतदारांनी ईव्हीएम मशीनचा विरोध करीत मतदानावर बहिष्कार टाकला. 
घोटमुंढरी येथील उदय दयाराम पांडे, डॉ. मिलिंद रंगारी, हरिदास घरडे, आष्टी येथील राम वाडीभस्मे, खात येथील नरेश तलमले, मौदा येथील मृणाल तिघरे, दिलीप तिघरे, राजेंद्र भुजाडे, माथनी येथील जगदीश वाडीभस्मे, अशोक क्षीरसागर, सुनील बावणे, प्रमोद पिसे अशा बारा तरुण मतदारांनी मताधिकार बजावण्यास नकार देणाऱ्या मतदारांची नावे आहेत. त्यांनी मतदान केंद्र क्रमांक 187 येथील मतदान केंद्राध्यक्षांना पत्र लिहून बहिष्कार केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 13 ऑक्‍टोबर2013 ला दिलेल्या निकालानुसार इलेक्‍ट्रिक डाटाचे कोणत्याही प्रकारचे भौतिक सत्यापन राहत नसल्याने ईव्हीएम मशीनद्वारे होणारी निवडणूक स्वतंत्र, पारदर्शक व निष्पक्ष होऊ शकत नाही. बॅलेट मशीनवर दिलेल्या मताचे जरी व्हीव्हीपॅट मशीनवर उमेदवाराला दिलेले मत दिसणार असले तरी कंटोल युनिटमध्ये माझे मत त्याच उमेदवाराला गेले किंवा नोटाला गेले, याचे कोणतेही भौतिक सत्यापन कंट्रोल युनिटमध्ये होत नाही, असे केंद्राध्यक्षांना दिलेल्या पत्रात बाराही मतदारांनी नमूद केलेले आहे. 
मताधिकार बजावण्यास नकार 
आमचे नाव जरी मतदार नोंदवहीमध्ये नोंदविले गेले. मात्र, आमच्यासाठी कंट्रोल युनिटमधून बॅलेट देण्यात आले असले तरी आम्हाला संविधानाने मूलभूत अधिकारात दिलेल्या कोणाच्याही दबावास बळी न पडता घ्यावयाच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारानुसार आम्ही नम्रपणे मताधिकार नाकारत आहे, असे युवकांनी पत्रात लिहिले आहे. आमचे नाव "मताधिकार बजावणीस नकार' यामध्ये समाविष्ट करण्याची विनंतीसुद्धा युवकांनी केली आहे
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT