विदर्भ

उष्माघाताचा बळी: विवाहापूर्वीचे देवदर्शन उठले जीवावर

सचिन शिंदे

आर्णी : जीवाची लाही लाही करणारं उनं रोजच्या दिवसाला तापत आहे. 46 डिग्रीच्या वरील तापमान घेऊन दिवसाची सुरुवात होत आहे. त्यामुळे मानवी जीवन कमालीचे विस्कळीत झालेले आहे. अशा दिवसात बाहेर देवदर्शनाला जाणे एका उपवर मुलीच्या मृत्यूचे कारण ठरले आहे.

आर्णी तालुक्यातील भंडारी जहागीर येथील रघुनाथ शिंदे यांची मुलगी कल्पना हिचा विवाह तालुक्यातील परसोडा येथील अनिल सोळंके या मुलाशी ठरला होता. मार्च महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला. 20 फेब्रुवारी 2020 लग्नाची तारीख निश्चित झाली. त्यांच्या परंपरेनुसार मुलीचे लग्न जुळल्यावर देवकार्य पार पाठण्यासाठी कुलदैवताच्या पायथ्याशी जावे लागते. त्यामुळे 25 एप्रिलला खासगी गाडी करून उपवर मुलीसोबत आई वडील, काका काकु, दोन भाऊ, आजी हे कोल्हापूर, जेजुरी, नातेपोते, नाथबाबा येथे गेले होते. उपवर मुलीचे लग्नापूर्वीचे दैविक कार्य आटोपून घरी परत येत असताना कल्पनाला उलट्या येऊ लागल्या म्हणून तुळजापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करून उपचार करून घराकडे निघाले.

प्रवासात तिचा त्रास वाढला. तेव्हा नांदेड पोहचले होते. तिला नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार केला परंतु उष्माघाताचा आघात जास्त असल्यामुळे तिच्यावर उपचार होऊ शकला नाही. अखेर तिचा मंगळवारी (ता.30 एप्रिल) मृत्यू झाला.

देवदर्शनाला गेलेल्या उपवर मुलीचा उष्माघाताने बळी घेतला. या घटनेमुळे कल्पना व अनिल यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटननेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT