पुसद (जि. यवतमाळ) : दिल्ली मार्गावरील पुसदचे हज सायकलयात्री.
पुसद (जि. यवतमाळ) : दिल्ली मार्गावरील पुसदचे हज सायकलयात्री.  
विदर्भ

व्हिसा न मिळाल्याने हजयात्रेला "ब्रेक'

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ), : सौदी अरेबियातील पवित्र हजयात्रेला जायचे अन्‌ तेही सायकलने, असा मनोमन संकल्प केलेल्या पुसद येथील चार युवा सायकलयात्रींना दिल्लीत दीड महिन्यापासून व्हिसा न मिळाल्याने त्यांच्या हजयात्रेला ब्रेक लागला आहे. अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हजयात्रेसाठी सहकार्य करावे, अशी युवकांची अपेक्षा आहे.
पाकचा व्हिसा कालच मिळाला, इराकचा सोमवारी (ता. 16) मिळण्याची आशा आहे. नंतर कुवेत, सौदीअरेबियाचा व्हिसा मिळताच हजयात्रेसाठी सायकलने कूच करू, असा इरफान खान महेबूब खान (वय 37), दौलतखान नासिरखान पठाण (32) व शेख अमजद खान महंमद (33) यांचा निर्धार आहे. मात्र, चौथा युवायात्री शेख तौफिक शेख मुनाफ नागपूरला परतला आहे. पुसदवरून सौदी अरेबियातील मक्‍का मदिना पाच हजार 600 किलोमीटर दूर आहे. हे अंतर दिल्ली, पाकिस्तान, इराक, कुवेतमार्गे तीन महिन्यांत कापत "हज'ला पोहोचण्याचा निर्धार सर्वसामान्य कुटुंबातील वाहतूक व्यावसायिक चार युवकांनी केला व ते तयारीला लागले. नवीन आधुनिक सायकली विकत घेऊन त्यांनी लांब प्रवासाची प्रॅक्‍टिस केली. ते 15 एप्रिलला पुसदवरून निघाले. अमरावती, बैतूल, भोपाळमार्गे सायकलने ते 28 एप्रिल रोजी दिल्लीला पोहोचले. तिथे पंतप्रधान कार्यालयातून त्यांना हजयात्रेसाठी सहकार्य करण्याचे पत्र मिळाले व त्यांनी अल्पसंख्याक खात्याचे व हजयात्रेचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची भेट घेतली. परंतु, व्हिसासाठी शिफारशीचे पत्र न मिळाल्याने अखेर वैयक्तिकरीत्या व्हिसासाठी प्रयत्न केले. दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व संबंधित मंत्र्यांच्याही भेटी घेतल्या. दीड महिन्यानंतर त्यांना पाकिस्तानचा व्हिसा मिळाला व इराणसाठी एजंटमार्फत प्रयत्न सुरू आहेत. व्हिसाअभावी त्यांच्या हजयात्रेला दिल्लीतच थांबा मिळाला असून, सायकलयात्री काहीसे नाराज झाले असले तरी व्हिसा मिळताच हज गाठू, असा त्यांचा आत्मविश्‍वास आहे. हजयात्रा सुरू झाली असून, मुख्य कार्यक्रम 19 ते 24 ऑगस्टपर्यंत आहे. व्हिसाचे सोपस्कार पूर्ण होताच एका दिवसाला 200 किलोमीटर वेगाने सायकलने हज गाठण्याचा निर्धार त्यांनी दिल्लीवरून "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT