wardha district got Skotch award 2020 read full story  
विदर्भ

वर्धेच्या शिरपेचात मानाचा तुरा! मिळाला राष्ट्रीय पातळीचा हा पुरस्कार.. कारण वाचून वाटेल अभिमान...  

रुपेश खैरी

वर्धा: वर्धा जिल्हा हा नेहमीच महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या काळापासून देशासमोर नवनवीन आदर्श निर्माण करत आला आहे. महात्मा गांधी यांच्या शिकवणीचे पालन करण्याचे काम जिल्ह्यातील नागरिकांनी नेहमीच केले आहे. यातच भर म्हणून वर्धा येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटेल असा सन्मान वर्धेला मिळाला आहे.   

सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने प्रारंभी 50 दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. शिवाय विविध उपाय योजना केल्या. स्कॉच पुरस्काराच्या स्पर्धेत सहभागी झाल्यावर ऑनलाइन पद्धतीचा वापर करून झालेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यात काय प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या याची महिती देण्यात आली. पहिली फेरी, दुसरी फेरी असे करीत या पुरस्कारासाठी अंतीम फेरीत पोहोचला.

मिळाला राष्ट्रीय पातळीचा सन्मान 

स्कॉच या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कॉच अवार्ड वर्धा जिल्ह्याला मिळाला असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे.  पीपीटीद्वारे अंतीम फेरीत उत्कृष्टपणे सादरीकरण केल्यानंतर वर्धा जिल्ह्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

'यांच्या' कार्यकाळातही मिळाला होता बहुमान 

जिल्हाधिकारी नवीन सोना यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला स्कोच अवार्ड प्राप्त झाला होता. त्यावेळी डीबीटी प्रणालीत उत्कृष्ट काम केल्यामुळे जिल्ह्याला बहुमान प्राप्त झाला होता. तर आता जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. 

हे सर्वांच्या मेहनतीचे  फळ 
हा पुरस्कार जिल्ह्यातील सर्व नागरिक, आरोग्य, पोलिस विभाग, ग्रामविकास आणि नगरविकास, जिल्हा परिषद आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या परिश्रमाचे फळ आहे. आतापर्यंत जिल्ह्याने उत्कृष्ठ काम करून कोरोनाचा संसर्ग कमी ठेवण्यासाठी काम केले. यापुढेही जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एकही मृत्यू होणार नाही यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही साथ द्यावी. 
- विवेक भीमनवार 
जिल्हाधिकारी, वर्धा  

संपादन -  अथर्व महांकाळ  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhigwan Love Story: आईलाच मुलीने खोटं ठरवलं! भिगवण प्रकरणाला नवे वळण, 21 वर्षीय तरुणीचं प्रतिज्ञापत्र अंगावर काटा आणणारं

Udan Scheme : ‘उडान’मुळे चार छोट्या शहरांशी जोडले पुणे; चार वर्षांत ६३०० उड्डाणे

Wagheshwar Temple: वर्षातून फक्त चार महिने दर्शनाचा योग; पुण्याजवळील हे शिवमंदिर पाहिलंत का?

Foreign Employment: जपानमध्येही संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा डंका; पन्नास विद्यार्थ्यांची २० लाखांच्या पॅकेजवर निवड, काैतुकाची मिळतेय थाप!

Grapes Rate : पिवळ्या-काळ्या द्राक्षांना मिळणार सोनेरी भाव; आखाती देशांसह देशांतर्गत बाजारपेठेतून वाढली मागणी

SCROLL FOR NEXT