आई-वडिलांची मेहनत सफल झाली, कौतुकही झाले, आनंदही झाला; मात्र, पुढे काय? वाचा संघर्ष…

Payal needs help for further education read full story
Payal needs help for further education read full story

पारशिवनी (जि. नागपूर) : दहावीची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या जिवनातील यश संपादन करणारी पहिली पायरी. भविष्यात कुठल्या दिशेने जयाचं हे ठरविण्यासाठी जिवनातील पहिली वेळ. दहावीच्या परीक्षेत आपल्या पाल्याने चांगली टक्केवारी द्यावी यासाठी अमाप पैसा खर्च करून पाल्याना नामवंत शिकवनी लावून दिली जाते. ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून कदाचित शंभर टक्के गुणही मिळवितात, पण…

पायल ही गावात राहते. तिचे वडील कामासाठी महिनो महिने घराबाहेर राहतात. आई काबाडकष्ट करून दोन पैसे मिळविते. पोटाची भूक, दर पाहिले तर तुरट्यानी, घरावर कवलन नाही, तुटक्या फुकट्या झोपडीला टिनाचे दार. दाहीदिशा दारिद्र, तरीही आईची माया लेकी सोबत. माझी मुलगी शाळा शिकणार म्हणून जोमाने कष्ट करून दोन पैसे जमा करून मुलीला पहिली ते दहावीपर्यंत शिकवले. पायल दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण घेऊन पास झाली. तिचा संघर्ष इतरांना प्रेरणा देणारा आहे.

पारशिवनी तालुक्यतील मोगरा या अगदी लहानशा खेड्यातील झोपडी वजा घरात राहून आईच्या कामात मदत करून दहावीच्या परीक्षेत तब्बल 87 टक्के गुण मिळवित लखलखीत यश मिळविले. यशाचे शिखर पदरी पाडले. मात्र, पुढे शिक्षणासाठी सोय नाही. उच्च शिक्षण द्यायचे आहे, पण परिस्थिती आडवी येते. मदतीचे हात देणारे अनेक आहेत पण भावना उपकाराची, ती स्वाभिमान हिराऊन टाकणारी.

आंधळ्यांना जसे दिसत नाही, तसे गरिबांना उच्च शिक्षण घेता येत नाही
शिक्षण म्हटल की पैसा लागणारच. तो नाही. ना आई-वडिलांची परिस्थिती. मग काय तर शेतीच्या कामाला जाने आणि आईला मदत करणे हाच उपाय शिल्लक राहतो. आवड-निवड उच्च शिक्षण हे मोठ्यालोकांसाठी राहते. ते गरिबांना नाही मिळू शकत. ते माझ्य  परिस्थितीवरून दिसून येतेच. "आंधळ्यांना जसे दिसत नाही" तसे गरीब धरच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही.

तर मी पण संधीचे सोने करेल

किती तरी आहेत मदतीचे हात. ते का माझ्यापर्यंत पोहोचण्यात असमर्थता दाखवित आहेत. एक जरी सहकार्याचा हात माझ्यापर्यंत पोहोचला तर मी पण संधीचे सोने करण्यात कमी पडणर नाही. शिक्षकांनी आपली जबाबदारी निभावली. पुढील उच्च शिक्षणासाठी शासन स्तरावरून तसेच समाजातून मदत झाल्यस आतापर्यंत शिक्षणासाठी पायलसह तिच्या पाल्यांना करावा लागलेला सघर्ष बऱ्याचअंशी पुढे कामी होईल. यासाठी इतरांनी समोर येऊन मदत केल्यास पायल ही इतराना प्रेरणा देणारी ठरेल.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com