Woman injured in wild boar attack.jpg 
विदर्भ

शेतात काम करताना झुडपातून येत होता आवाज अन् त्याने अचानक येऊन महिलेवर...

सकाळ वृत्तसेवा

साखरखेर्डा (जि.बुलडाणा) : सिंदखेडराजा तालुक्यातील रानअंत्री येथील एक शेतकरी महिला शेतात काम करीत होती. शेतातील काडीकचरा वेचत असतानाच शेजारच्या झुडपातून अचानक तिला आवाज आला.

सध्या खरीप पेरणी जवळ आल्यामुळे बहुतेक शेतकरी कुटुंबासह शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीस मग्न आहे. आज सकाळी रान अत्री येथील शेतकरी रामेश्वर केवट पत्नी मीना केवट आणि दोन मुलांसह शेतात काम करण्यासाठी गेले. शेतातील काडीकचरा वेचत असतानाच शेजारच्या झुडपातून अचानक एक रानडुकर आले. त्याला पाहताच महिलेने आरडाओरडा केला व पतीच्या दिशेने धावली. पतीकडे धावत असताना रानडुकराने मागून येऊन महिलेवर हल्ला केला व जखमी केले.

रानडुकरांच्या या हल्ल्यात महिलेच्या मांडीला कडाडून चावा घेतला. यात सदर महिला जखमी झाली. महिलेला रानडुकरांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी इतर शेतकरी हातात लाठ्याकाठ्या घेऊन रानडुकरांच्या दिशेने धावले. लोकांचा घोळका पाहून रानडुकराने जंगलात पलायन केले. आज पासून मृग नक्षत्र लागले असून शेतकरी शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतात काम करीत आहे. मात्र, जंगली प्राण्यांचा शिरकाव आता गाव कुसात मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

परिसरात निलगायींनी (रोही) संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यांचा शेतातील उपद्रव वाढला असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याच बरोबर रानडुकराची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून ते शेतातील पिकांचे मोठे नुकसान तर करतातच पण शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांवर सरळ हल्ला करीत आहेत. या रानडुकरांचा आणि निलगायीचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा अशी मागणी रान अंत्रीसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील रुग्णांसाठी खुशखबर! आता कमी दरात औषधं मिळणार; जेनेरिकसोबत ब्रँडेड औषधांवरही सवलत

Fuel Rate: सर्वसामान्यांना पुन्हा झटका? पेट्रोल-डिझेलचे दर ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता; भाववाढीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा

New Fuel Launch: E85 इंधन आलं पण तुमच्या E20 आणि पेट्रोल गाडीचं काय होणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण

India A Squad: भारत अ संघाची घोषणा! ध्रुव जुरेलकडे मोठी जबाबदारी, 'या' युवा वेगवान गोलंदाजाची लागली लॉटरी

Transgenders Scheme: तृतीयपंथीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय, व्यवसायासाठी २ लाख मिळणार; कसा लाभ घेता येणार?

SCROLL FOR NEXT