Time Management
Time Management Sakal
वुमेन्स-कॉर्नर

घरकुल अपुले : घरातल्या वेळेचं व्यवस्थापन

सकाळ वृत्तसेवा

आकाश आपल्या सगळ्यांसाठी एकच असतं; पण ‘क्षितिज’ मात्र प्रत्येकाचं वेगळं!... अगदी तसंच चोवीस तासांचा वेळ सगळ्यांना समान मिळाला आहे; पण प्रत्येक जण तो वेगळ्या पद्धतीनं वापरतो.

- मीनल ठिपसे

आकाश आपल्या सगळ्यांसाठी एकच असतं; पण ‘क्षितिज’ मात्र प्रत्येकाचं वेगळं!... अगदी तसंच चोवीस तासांचा वेळ सगळ्यांना समान मिळाला आहे; पण प्रत्येक जण तो वेगळ्या पद्धतीनं वापरतो. यावर एक वाक्य आठवतं- ‘एक तर तुम्ही दिवस चालवा किंवा दिवस तुम्हाला चालवेल’ आणि हे सर्व क्षेत्रांतील लोकांसाठी लागू पडतं. मग विद्यार्थी असो, कॉर्पोरेट कर्मचारी असो, किंवा गृहिणी!

बरेचदा असा समज असतो, की ही संकल्पना फक्त कॉर्पोरेट विश्वातील; पण दैनंदिन जीवनातील किंवा घराचे असे नियोजन असते, तेही अगदी पूर्वीपासून होत आलंय!

कॅलेंडरवर वाढदिवस किंवा कुणाचं लग्नकार्य... काही महत्त्वाच्या नोंदी गृहिणी कायम करत आलेल्या आहेत. कित्येक स्त्रिया रोजचा हिशेब न चुकता लिहितात, नकळत वाण सामानाच्या याद्या तयार असतात. आल्या गेलेल्याला देण्यासाठी काही छोट्या गोष्टी ठेवणीतल्या कप्प्यात कायम असतात. महिन्याची बिलं.. घरकामाच्या मदतनिसांचा पगार.. मुलांच्या शाळेच्या फिया ज्या त्या वेळेस भरल्या जातात. इस्त्रीवाल्याकडे कपडे देणं, आणणं.. घरातील भाजीपाला, फळं याकडे बारीक लक्ष असतं... ही आणि अशी कित्येक कामं आणि करिअरची धडपड सुरू असते. त्यामुळे ताण येणं स्वाभाविक आहे म्हणूनच अधिक उत्तमरित्या वेळेचं व्यवस्थापन किंवा नियोजन करणं महत्त्वाचं.

किशोर बियाणी यांचं एक वाक्य आहे- ‘आयुष्य प्रीपेड टॅक्सीप्रमाणे आहे’... असं असल्यास या मर्यादित वर्षांचा, दिवसांचा, चोवीस तासांचा विनियोग कसा उत्तम पद्धतीनं करता येईल यासाठी काही सोप्या टिप्स

हवं काय, नको काय याची चाचपणी व नको त्या वस्तू फेकून देणं.

उद्या काय करायचं याची यादी आदल्या दिवशी रात्री तयार ठेवणं.

प्रत्येक वस्तूसाठी जागा आणि जागेवर वस्तू. (अगदी आपल्या अनुपस्थितीतसुद्धा इतरांना वेळच्या वेळी आणि जागच्या जागी वस्तू सापडायला हवी.)

आपला दिवस थोडा लवकर सुरू करणं, जेणेकरून आपल्याकडे सर्व कामांसाठी योग्य कालावधी असेल.

दिवसाच्या प्रत्येक तासाला आपण कोणत्या व्हॅल्यू ॲडेड आणि नॉन व्हॅल्यू ॲडेड गोष्टी करतो याची साधारण एकवीस दिवस नोंद ठेवणं.

वेळ फुकट कुठं जातो याकडे लक्ष देणं व त्यात सुधारणा करणं (हरवणं, शोधणं, चुकणं, भांडणं, विनाकारण रागावणं, अतिविचार करणं, फोनवर अनावश्यक गप्पा).

ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत त्याला ठामपणे नाही म्हणायला शिकणं.

घरातली कामं सर्व लोकांनी वाटून घेण्याची सवय.

कामं झाल्यावर टिक करणं व प्रायोरिटीनुसार; तसंच अर्जंट काय व महत्त्वाचं काय याचा मेळ साधणं.

आठवड्याभरात महिन्यात- सहा महिन्यांत वर्षभरात कामं कशी केली जातील, याचा आराखडा तयार असणं (उदाहरणार्थ, पूर्ण आठवड्याचं मेनू प्लॅनिंग व त्यानुसार वाणसामान व भाजीपाला याची तयारी... महिन्याची बिले वेळच्या वेळी भरणं.. सहा महिन्यांतून काही डागडुजी, पडदे धुणं आणि वर्षातून काही खर्चिक कामं, टॅक्स भरणं वगैरे तरतूद करून ठेवणं)

अशा प्रकारे वेळेचं नियोजन केलं, तर नक्की आपले छंद जोपासायला, आवडीचं पुस्तक वाचायला, किंवा गाणी ऐकायला मिळेल... आपली कामं शांतपणे आणि चोख बजावायला जमेल... आणि स्ट्रेस लेव्हल नक्की कमी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT