Video-Conferencing
Video-Conferencing 
युथ्स-कॉर्नर

गॅजेट्स : लॉकडाउन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या पथ्यावर

ऋषिराज तायडे

भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. परिणामी जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. बहुतांश सरकारी, निमसरकारी आणि खासगी कंपन्यांनी परिस्थितीला सामोरे जात त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला आहे. व्हर्चुअल बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आदी माध्यमांतून कर्मचारी एकमेकांशी चर्चा करून काम करत आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सबाबत ॲप्स सध्याच्या लॉकडाऊन स्थितीत मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरत आहेत. यामध्ये सध्या स्काइप, झूम, हॅंगआउट्‌स आदी ॲप्सची मागणी बरीच वाढली आहे. झुमने सध्या मोठ्या संख्येने ग्राहकांना आपल्याकडे वळवले आहेत. गेल्या पंधरवड्यात (१४ ते ३१ मार्च) या व्हिडिओ कॉन्फरन्स ॲप्सचे तब्बल ६.२ कोटी डाऊनलोड झाले आहेत. सध्या प्रचलित असलेले काही निवडक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप्स...

झूम
लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक चर्चेत आलेली कंपनी म्हणजे झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्स. सध्याच्या आणीबाणीच्या काळात प्ले-स्टोअरवरून झूम ॲपच्या डाऊनलोडचे प्रमाण इतके वाढले आहे, की त्यांनी टिकटॉक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम यांनाही मागे टाकले आहे. झूम ॲपचे खास वैशिष्ट्य म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सला एकाचवेळी शंभर जण सहभागी होऊन चर्चा करू शकतात. सध्या अनेक कर्मचारी घरून काम करताना व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी झुमला प्राधान्य देत आहे.

स्काईप
अनेक वर्षांपासून व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी स्काईपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. स्काईपच्या सक्रिय वापरकर्त्यांमध्ये ७० टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, सध्या जवळपास ४.४ कोटी लोक स्काईपचा वापर करत आहेत. स्काईप ते स्काइप कॉलिंगच्या सरासरी मिनिटांचे प्रमाणही तब्बल २२० टक्क्यांनी वाढली असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टच्याच मायक्रोसॉफ्ट टिम्स या व्यावसायिक सेवेचेही ४.४ कोटी वापरकर्ते झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

व्हॉट्‌सॲप
सोशल मिडियातील लोकप्रिय ॲप म्हणजे व्हॉट्‌सॲप. त्यावरील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अनेक जण एकमेकांशी संवाद साधतात. सध्या व्हॉट्‌सॲपच्या वापरकर्त्यांमध्येही ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, व्हिडिओ कॉल्स, चॅट मेसेजेस, स्टेट्‌स आदी सर्वांचेच प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकजण घरी असल्याने लोकांचे स्टेट्स ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी व्हॉट्‌सॲपने भारतातील नेटवर्कवरील लोड कमी व्हावा म्हणून स्टेट्‌ससाठीची ३० सेकंदाची मर्यादा १५ सेकंदावर आणली आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT