Lockdown: 4 जी स्पीड मंदावले 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 15 April 2020

अनेक कंपन्यांनी यामुळे कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम' दिले आहे. यामुळे प्रामुख्याने मोबाईल डेटाचा वापर 20 टक्‍क्‍यांहून अधिक वाढला आहे. वाढलेला वापर आणि नेटवर्कवरील ताण यामुळे 4जी स्पीड कमी झाला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने देशभरात 25 मार्चपासून लॉकडाउन आहे. अनेक कंपन्यांनी यामुळे कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम' दिले आहे. यामुळे प्रामुख्याने मोबाईल डेटाचा वापर 20 टक्‍क्‍यांहून अधिक वाढला आहे. वाढलेला वापर आणि नेटवर्कवरील ताण यामुळे 4जी स्पीड कमी झाला आहे. सर्वच दूरसंचार कंपन्यांचा 4जी स्पीड मार्चमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डाऊनलोड स्पीड (एमबीपीएस) 
कंपनी - फेब्रुवारी - मार्च 
रिलायन्स जिओ - 21.5 - 19.6 
व्होडाफोन - 8 - 6.7 
एअरटेल - 8 - 6.2 
आयडिया - 6.3 - 5.1 

मार्चमधील अपलोड स्पीड (एमबीपीएस) 
रिलायन्स जिओ - 3.6 
व्होडाफोन - 5.8 
एअरटेल - 3.2 
आयडिया - 5.1 

बीएसएनएल ब्रॉडबॅंडही संथ 
बीएसएनएलकडून प्रामुख्याने 3जी सेवा दिली जाते. कंपनीच्या मोबाईल ब्रॉडबॅंड स्पीडमध्ये 5 टक्के घट होऊन ते 1.8 एमबीपीएसवर आले आहे. 

मोबाईल ब्रॉडबॅंड कनेक्‍शन 97 टक्के 
देशभरातील ब्रॉडबॅंड कनेक्‍शनपैकी सुमारे 97 टक्के कनेक्‍शन ही मोबाईलवर आहेत. यामुळे "वर्क फ्रॉम होम' करताना मोबाईलवरील इंटरनेटचा वेग हा अतिशय महत्वाचा घटक ठरत आहे. यातच इंटरनेटचा वेग कमी झाल्याने घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4G speed slowed down