anand mahindra twitter after arvind krishna became ceo of ibm company
anand mahindra twitter after arvind krishna became ceo of ibm company

आनंद महिंद्रांचं हटके ट्विट; व्हाईट हाऊसला स्नॅक्समध्ये 'समोसा' ठेवावा लागेल!

मुंबई : आयबीएमच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या अरविंद कृष्णा यांची निवड झाल्यानंतर भारतीयांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरवर कायम सक्रिय असणारे आणि नेहमी हटके ट्विट करून लक्ष वेधणारे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा Anand Mahindra यांनी देखील अरविंद कृष्णा यांचे अभिनंदन करतानाच आयटी क्षेत्रातील भारतीयांच्या वाढत्या महत्वावरून विनोदी अंगाने भाष्य केले. भारतीयांच्या वाढत्या महत्वाचा संदर्भ पकडून त्यांनी यापुढे व्हाईट हाऊस जेंव्हा आयटी क्षेत्रातील प्रमुखांची बैठक आयोजित करेल तेंव्हा स्नॅक्समध्ये हॅमबर्गर्स ऐवजी समोसा ठेवावा लागेल असे म्हटले आहे.

सगळीकडे भारतीयच
कृष्णा यांची आयबीएमच्या प्रमुखपदी नेमणूक होण्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या (मल्टिनॅशनल) प्रमुखपदी भारतीयांची निवड होणारी यादी वाढतच चालली आहे. या यादीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, गूगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा, पेप्सीकोचे माजी सीईओ इंद्र नुयी आणि अ‍ॅडोबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांचा समावेश आहे.

बजेट आणि अर्थविश्वच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

काय म्हणाले आनंद महिंद्रा?
ज्याप्रमाणे भारतातील बहुतांश विशेषतः उत्तरेकडील राज्यात स्नॅक्समध्ये 'समोसा' हा खाद्यपदार्थ लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन नागरिकांमध्ये हॅमबर्गर्सची लोकप्रियता आहे.  मॅकडोनाल्डसकडून बनविण्यात येणाऱ्या हॅमबर्गर्सची लोकरीप्रियता इतकी आहे की १९६८ साली फ्रान्समध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या खेळाडूंना जेव्हा घरची आठवण होऊ लागली, तेव्हा त्यांच्यासाठी खास विमानाने मॅकडोनाल्डसचे हॅमबर्गर्स पाठविण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com