नाशिकमधून 500 च्या 50 लाख नव्या नोटा आरबीआयकडे

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नाशिक : नाशिक येथे नोटा छापणाऱ्या प्रेसने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला 500 रुपयांच्या 50 लाख नव्या नोटा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत.

नाशिक : नाशिक येथे नोटा छापणाऱ्या प्रेसने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला 500 रुपयांच्या 50 लाख नव्या नोटा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत.

नाशिकच्या प्रेसने पहिल्या टप्प्यात 500 च्या नव्या नोटा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला पाठविल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. बुधवारीही 500 रुपयांच्या आणखी 50 लाख नोटा नाशिकमधूनच रिझर्व्ह बॅंकेकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय 50 आणि 100 रुपयांच्या नोटा छापण्याची संख्याही वाढविण्यात आली आहे. दरम्यान नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकांसमोर, पोस्ट कार्यालयासमोर आणि पैसे काढण्यासाठी एटीएम्ससमोर अद्यापही रांगा लागलेल्याच आहेत. तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही सर्व परिस्थिती सामान्य होण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागेल असे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik press sends first lot of 5 million new Rs 500 notes to RBI