esakal | करदात्यांसाठी आनंदाची बातमी ! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची 'मोठी' घोषणा...
sakal

बोलून बातमी शोधा

income tax

आज केंद्र सरकारकडून करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारनं २०१९-२० चं प्राप्तिकर विवरण पात्र म्हणजेच आयटी रिटर्न भरण्याची मुदत ३१ जुलैपासून वाढवून आता ३० नोव्हेंबर केली आहे. 

करदात्यांसाठी आनंदाची बातमी ! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची 'मोठी' घोषणा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनामुळे देशात सर्व उद्योगधंदे, व्यवसाय आणि कंपन्या बंद असल्यामुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट होत चालली होती. मात्र आज केंद्र सरकारकडून करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारनं २०१९-२० चं प्राप्तिकर विवरण पत्र म्हणजेच आयटी रिटर्न भरण्याची मुदत ३१ जुलैपासून वाढवून आता ३० नोव्हेंबर केली आहे. 

लॉकडाऊनमध्येही सरकारकडून काही उद्योग आणि कंपन्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच काल केंद्र सरकडून देशासाठी २० लाख कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात येतंय. याला सरकारनं 'आत्मनिर्भर अभियान' असं नाव दिलंय. या अभियानांतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयटी रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याची घोषणा केली आहे. 

हेही वाचा: मोदी सरकारनं जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवरून मनसेचा भाजपला टोला...विचारला 'हा' प्रश्न..

याआधी २०१९-२० या वर्षाचा आयटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आलेलं आर्थिक संकट लक्षात घेऊन आणि नोकरदारांना आयटी रिटर्नसाठी लागणार वेळ लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं आयटी रिटर्न फाईल करण्याची मुदत वाढवावी म्हणजे आयटी रिटर्न भरणाऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करायला वेळ मिळेल अशी इच्छा चार्टर्ड अकाउंटंट आणि कर सल्लागारांची होती. 

हेही वाचा: 'या' काही शेअर्समध्ये उद्धव ठाकरेंनी गुंतवले आहेत आपले पैसे... 

विवाद से विश्वास:

वैयक्तिक करदात्यांसाठी सरकारनं आज आणखी एक घोषणा केली आहे. कराशी निगडित प्रलंबित खटले तडजोडीनं निकाली काढणाऱ्या विवाद से विश्वास योजनेला सरकारनं दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता विवाद से विश्वास योजनेचा करदात्यांना ३१ डिसेंबरपर्यंत लाभ घेता येणार आहे. 

Government increases deadline for filing income tax return till November