मोदी सरकारनं जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवरून मनसेचा भाजपला टोला...विचारला 'हा' प्रश्न... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निर्णयावर टीका करत सरकारला एक कठीण प्रश्न विचारला आहे. 

मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. जगभरात कोरोनाचे तब्बल ४३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत तर ३ लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थतीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निर्णयावर टीका करत सरकारला एक सवाल केलाय. 

हेही वाचा: मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी दिले 'हे' आदेश

देशातल्या बहुतांश विरोधी पक्षांनी या पॅकेजला जनतेला फसवणारं पॅकेज म्हंटलं आहे. मात्र भाजपपासून वेगळं होऊन महाविकास आघाडीत गेलेल्या शिवसेनेनं केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईसाठी वेगळं पॅकेज देण्याची मागणी केली आहे. मनसेनं केंद्र सरकारला  यावरून टोला लगावलाय. 

पीएम केअर फंडासाठी एवढी जाहिरात का करता?

'२० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतरही पीएम केअर फंडासाठी एवढ्या जाहिराती का करता'? असा अडचणीत टाकणारा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केंद्र सरकारला विचारला आहे. 

हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी ४० खाटांचे ICU; महापालिका आयुक्तांकडून आढावा 

त्यामुळे आता मनसेनं विचारलेल्या या कठीण प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकार देतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे.

जगभरातले विकसित देश कोरोना व्हारासपुढे हतबल झाले आहेत. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या गरिबांसाठी आणि कोरोनापासून देशाचा बचाव करण्यासाठी तब्बल २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र देशातल्या विविध राजकीय पक्षांकडून आता यावर टीका होत आहे. 

mns criticized central government on 20 lac crore package read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns criticized central government on 20 lac crore package read full story