नार्को चाचणीला शेट्टीचा नकार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 August 2019

मुंबई: पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी असलेला माजी अधिकारी गोकुळनाथ शेट्टी याने नार्को चाचणीला विरोध दर्शवला आहे. याप्रकरणी बुधवारी विशेष न्यायालयात सुनावणी झाली. 

मुंबई: पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी असलेला माजी अधिकारी गोकुळनाथ शेट्टी याने नार्को चाचणीला विरोध दर्शवला आहे. याप्रकरणी बुधवारी विशेष न्यायालयात सुनावणी झाली. 

पंजाब नॅशनल बॅंकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत माजी अधिकारी असलेल्या शेट्टीवर सीबीआयने गैरव्यवहाराबाबत गंभीर आरोप ठेवले आहेत. सुमारे 12 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात त्याची महत्त्वाची भूमिका होती. अनेक बोगस कर्ज प्रकरणे करून बॅंकेचे मोठे नुकसान करण्यात आले, असे आरोप त्याच्यावर आहेत. याप्रकरणी सीबीआयने शेट्टीची नार्को व पॉलिग्राफ चाचणी करण्याची मागणी केली होती. या चाचणीसाठी आरोपीची परवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. 

शेट्टी याच्या वकिलांनी नार्को व पॉलिग्राफ चाचण्यांना बुधवारी विशेष न्यायालयात विरोध दर्शवला. या गैरव्यवहारात आरोपीला लाभ झाल्याचा सीबीआयचा आरोप तथ्यहीन आहे. अशा प्रकारचा कोणताही लाभ मिळालेला नाही, असा दावा शेट्टीने केला. कित्येक महिन्यांपासून आपली प्रकृती ठीक नाही. त्यामुळेही ही चाचणी करून घेण्याची आपली तयारी नाही, असे कारण त्याने दिले. याप्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्यापुढे 28 ऑगस्टला पुढील सुनावणी होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shetty's rejection of the narco test