आता फेसबुकवरून करा मोबाइलचे रिचार्ज

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबुकवरून आता मोबाइल रिचार्ज करता येणार आहे. तुमच्याकडे एंड्रॉईड फोन असेल तर फेसबुकचे मोबाइल रिचार्ज फीचर फोनवर उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली: सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबुकवरून आता मोबाइल रिचार्ज करता येणार आहे. तुमच्याकडे एंड्रॉईड फोन असेल तर फेसबुकचे मोबाइल रिचार्ज फीचर फोनवर उपलब्ध आहे. फेसबुकच्या मोबाइल रिचार्ज फीचर वरून कोणत्याही कंपनीचे रिचार्ज करता येणार आहे. आयफोन वापरणाऱ्यांना मात्र फेसबुकचे हे नवीन मोबाइल रिचार्ज फीचर मिळायला उशीर होणार आहे. आयओएस आणि डेस्कटॉपवर देखील लवकरच हे फीचर मिळणार असून पोस्टपेड बिलाचा भरणा देखील यावरून नंतर करता येणे शक्य होणार आहे. 

कसे कराल रिचार्ज: 

गुगल प्ले स्टोअरवरून फेसबुकचे नवीन अँप डाउनलोड करता येणार आहे.  फेसबुकचे नवीन अँप डाउनलोड केल्यानंतर त्यावर मोबाइल रिचार्जचा पर्याय उपलब्ध होणार आहे. 

* नवीन फीचरसाठी हॅम्बर्गर आयकॉनवर क्लिक करा 
* मोबाईल रिचार्जचा पर्याय निवडा किंवा काही व्हर्जनमध्ये मोबाईल टॉप-अप नावाने       हा पर्याय उपलब्ध असेल. 
* स्क्रीनवर  मोबाईल रिचार्जचा पर्याय न दिसल्यास  See More option मध्ये जाऊन    एकदा  पर्याय पहा
* मोबाइल रिचार्ज पर्यायावर पोचल्यावर फेसबुकवर वेलकम स्क्रीन दिसेल. 
* यांनतर तुम्हाला क्रेडिट अथवा डेबिट कार्डाचा पर्याय विचारला जाईल. 
*  क्रेडिट अथवा डेबिट पर्यायानंतर 'रिचार्ज नाउ' बटनावर क्लिक करावे लागेल. 
* यांनतर मोबाईल फोन नंबर विचारला जाईल. शिवाय मोबाईल ऑपरेटरची निवड         करायची किंवा फेसबुक स्वतः नंबरवरून योग्य ऑपरेटरची निवड करेल. 
* नंतर किती रुपयांचे रिचार्ज आणि कोणता पॅक उपलब्ध आहे ते दाखवले जाईल. 

सर्व पर्यायांची निवड केल्यांनतर पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल. यात आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा तपशील विचारला जाईल. अखेर 'प्लेस आर्डर' पर्यायावर क्लिक केल्यानंतर रिचार्ज होणार आहे. सध्या डेबिट किंवा क्रेडिटच्या माध्यमातूनच फेसबुक अँपद्वारे मोबाइल रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे पेमेंटसाठी इतर कोणत्याही वॉलेटला हे जोडता येणार नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook for Android Now Lets You Recharge Your Mobile Number