शाओमीची 18 दिवसांत दहा लाख स्मार्टफोन विक्री 

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

बीजिंग : शाओमी या चीनमधील मोबाईल कंपनीने भारतात या महिन्यातील 18 दिवसांत दहा लाख स्मार्टफोन विकले आहेत. देशात चीनमधील वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी वाढत असतानाही कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

भारतातील सर्वांत मोठी स्मार्टफोन विक्रेती कंपनी होण्याचा शाओमीचा मानस आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी स्मार्टफोन बाजारपेठ आहे. या महिन्याच्या सुरवातीच्या 18 दिवसांत कंपनीने दहा लाख स्मार्टफोन विक्री केले आहेत. दिवाळी महोत्सवात ही विक्री झाली आहे.

शाओमी जागतिक पातळीवरील धोरणात भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. चीनच्या बाहेरील ती सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. शाओमीची स्पर्धक कंपनी हुवेईने भारतात स्मार्टफोन जोडणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील बाजारपेठेत स्मार्टफोनची विक्री कमी होत असल्याने तेथील कंपन्या बाहेरील बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करीत आहेत. 

जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहर याला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील प्रस्तावाला चीनने विरोध केला आहे. यामुळे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालावा, अशी मागणी भारतात जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या कंपन्या मात्र आपले जाळे विस्तारताना दिसत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Xiaomi sells 1 million handsets in India in 18 Days