परांजपे स्कीम्सच्या वतीने ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पुणे - बांधकाम क्षेत्रातील परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्‍शन) लि.च्या वतीने येत्या १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन येथे ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृह महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी केली. या वेळी अध्यक्ष श्रीकांत परांजपे हेही उपस्थित होते. 

शशांक परांजपे म्हणाले, की परांजपे स्कीम्समध्ये उपलब्ध असलेले सर्व गृहपर्याय ग्राहकांना एकाच छताखाली पाहता यावेत यासाठी आम्ही ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृहमहोत्सवाचे दुसऱ्यांदा आयोजन करीत आहोत. समाजातील प्रत्येक आर्थिक गटाच्या ‘बजेट’ला परवडणारे गृहपर्याय येथे असतील. या महोत्सवात पुणे शहर आणि लगतच्या परिसरातील तसेच मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी या शहरांव्यतिरिक्त बेंगळूरू आणि बडोदा येथे विकसित होत असलेल्या गृहप्रकल्पांचा देखील समावेश आहे. या महोत्सवात घर खरेदी करणाऱ्यांना अनेक सवलती देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत पात्र खरेदीदारांना सबसिडीचा लाभही मिळू शकणार आहे. या गृहमहोत्सवात ‘सीनियर लिव्हिंग एक्‍स्पो’ या खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या प्रदर्शनाचा अंतर्भाव असणार आहे. याबरोबरच पुणे पोलिसांचाही एक स्टॉलही असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: परांजपे स्कीम्सच्या वतीने ऑप्शन्स अनलिमिटेड

टॅग्स