नवीन वर्षापासून मोबाईल ते बँकिंगपर्यंतचे नियम बदलणार; त्याविषयी जाणून घ्या

Mobile
Mobile

नवीन वर्ष चालू होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. यंदाच्या वर्षातील बराचसा काळ कोरोनाच्या संकटामुळे खर्ची गेला. आणि त्यामुळे सगळेच जण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर नवीन वर्षापासून बऱ्याच नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे नियम आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्यामुळे याची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. अन्यथा नवीन वर्षाच्या सुरवातीलाच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून वॉट्सअप पासून ते फोन नंबर आणि बँकेतील चेक संदर्भातील काही नियमांमध्ये बदल होणार आहे. 

नवीन वर्षाच्या सुरवातीपासून बँकेतील चेकच्या प्रक्रियेत बदल होणार आहे. यापुढे चेक पेमेंट पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या द्वारे होणार आहे. यामध्ये चेक इश्यू करणाऱ्या व्यक्तीला चेक दिल्यानंतर काही डिटेल्स म्हणजे तारीख, देणाऱ्याचे नाव, प्राप्त करणाऱ्याचे नाव आणि रक्कमची माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे बँकेला द्यावी लागणार आहे. व बँकेने ही माहिती व्हेरिफाय झाल्यानंतरच चेकचे पेमेंट करण्यात केले जाणार आहे. या सिस्टीममुळे फसवणूक थांबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच, हा नियम 50000 किंवा त्याहून अधिक रक्कम चेकच्या मदतीने करताना लागू होईल. शिवाय मेसेज, ऍप आणि इंटरनेटच्या माध्यमातून ही माहिती बँकेला देता येणार आहे.   

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाकडून नवीन वर्षांपासून सर्व चारचाकी वाहनांसाठी टोल भरण्याकरिता फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे टोल भरताना फास्टटॅग नसल्यास वाहनचालकांना टोलची दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे. व यामुळे टोलची प्रक्रिया आता संपूर्णपणे डिजिटल होणार असून, टोल प्लाझावरील रोख व्यवहार थांबवले जाणार आहेत.  त्यानंतर नवीन वर्षापासून आर्थिक देवाण-घेवाण करताना देखील व्यवहाराचे नियम बदलनार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार नवीन वर्षात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी कॉन्टॅक्टलेस कार्डद्वारे पेमेंटची मर्यादा 2000 वरून 5000 रुपये करण्यात आली आहे.   

तसेच 1 जानेवारी 2020 पासून देशभरात लँडलाईनवरून मोबाईल फोन कॉल करताना मोबाईलच्या नंबरपूर्वी शून्य लावावे लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात टेलिकॉम विभागाने हा आदेश जारी केला होता. आणि ही शिफारस ट्रायने मान्य केलेली असून, लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करताना यापुढे नंबरच्या अगोदर शून्य लावणे अनिवार्य राहणार आहे. 2021 पासून मोबाईल मधील अँड्रॉइड 4.3 आणि आयओएस -9 ऑपरेटिंग सिस्टमवर सोशल मीडियावरील वॉट्सअप बंद होणार आहे. वॉट्सअपने आणलेल्या नवीन फिचर्समुळे या किंवा याहून मागच्या ऑपरेटिंग सिस्टमवर वॉट्सअप चालणार नाही.      


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com