
होंडाने आर्थिक वर्ष २०१९-२० च्या अखेर ६.५ लाख युनिट इतकी या उद्योगातील सर्वाधिक BS-VI युनिट विक्री केली आहे. BS-VI होंडा टू व्हीलरमध्ये होंडाचे जगभर नावाजलेले पेटंटेड तंत्रज्ञान वापरले जाते.
पुणे - होंडा मोटरसायकल ॲण्ड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने (एचएमएसआय) BS-VI टू-व्हीलरच्या एकत्रित विक्रीमध्ये देशांतर्गत बाजारात ११ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.
‘एक्वाएटरिव्होल्युशन’ जाहीर करणारी आणि सप्टेंबर २०१९ या अंतिम मुदतीच्या सहा महिने आधीच ‘ॲक्टिव्हा १२५’ दाखल करून BS-VI माॅडेलच्या विक्रीला सुरुवात करणारी होंडा टू-व्हीलर्स इंडिया ही देशातील पहिलीच टू-व्हीलर उत्पादक कंपनी आहे. होंडाने आर्थिक वर्ष २०१९-२० च्या अखेर ६.५ लाख युनिट इतकी या उद्योगातील सर्वाधिक BS-VI युनिट विक्री केली आहे. आज, ११ लाखांहून अधिक युनिटची विक्री झाली. BS-VI होंडा टू व्हीलरमध्ये होंडाचे जगभर नावाजलेले पेटंटेड तंत्रज्ञान वापरले जाते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कंपनीचे सेल्स व मार्केटिंगचे संचालक यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘‘आमच्या ११ आधुनिक BS-VI माॅडेलनी ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. या मॉडेलनी भारतातील ग्राहकांसाठी टू व्हीलर चालवण्याचा नवा आनंद निर्माण केला आहे, ही होंडासाठी अभिमानाची बाब आहे.’’