नोटाबंदीनंतर आता "जीडीपी'च्या 12 टक्के 

वृत्तसंस्था
Wednesday, 15 April 2020

एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या(जीडीपी)तुलनेत देशात वितरणात असलेल्या चलनाचे प्रमाण नोव्हेंबर2016मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर प्रथमच आता12टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे

नवी दिल्ली  - एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत देशात वितरणात असलेल्या चलनाचे प्रमाण नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर प्रथमच आता 12 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वितरणातील एकूण चलन 27 मार्चला 24.39 ट्रिलियन रुपये होते. मागील आर्थिक वर्षासाठी (2019-20) "जीडीपी' 203.85 ट्रिलियन रुपये असेल, असा अंदाज आहे. या आधारे व्यवस्थेतील चलन "जीडीपी'च्या 12 टक्के होते. वास्तव आकडा पाहिल्यास तो "जीडीपी'च्या 12 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. कारण कोविड-19 च्या प्रादुर्भावाआधी "जीडीपी'चा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे "जीडीपी' आणखी खाली घसरण्याचा अंदाज आहे. यामुळे तो प्रत्यक्षात 203.85 ट्रिलियन रुपयांपेक्षा कमी असेल. हा आकडा विचारात घेता वितरणातील चलनाचे प्रमाण "जीडीपी'च्या 12 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असेल. 

दिवसेंदिवस प्रमाण वाढतेय 
मागील आर्थिक वर्षाचा "जीडीपी' 200 ट्रिलियन रुपयांपर्यंत खाली आल्यास वितरणातील चलनाचे प्रमाण 12.2 टक्के होते. वितरणातील चलनात सातत्याने वाढ होत असून, 3 एप्रिलला ते 24.57 ट्रिलियन रुपयांवर पोचले होते. हे वाढणारे प्रमाण लक्षात घेता वितरणातील चलनाचे प्रमाण नोटांबदीपेक्षा अधिक होईल, अशी शक्‍यता आहे. 

वितरणातील चलन 
27 मार्च - 24.39 ट्रिलियन रुपये 
3 एप्रिल - 24.57 ट्रिलियन रुपये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 percent of GDP after demonetisation

Tags
टॉपिकस
Topic Tags: