या कंपनीचा तीन वर्षांत 17 पट परतावा, आता एका शेअरचे मिळतील 10 शेअर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

या कंपनीचा तीन वर्षांत 17 पट परतावा, आता एका शेअरचे मिळतील 10 शेअर्स

मुंबई : अ‍ॅक्सिटा कॉटन (Axita Cotton) ही कंपनी गुंतवणूकदारांसाठी बहुगुणी ठरली आहे. जवळपास तीन वर्षांत कंपनीचे शेअर्स सुमारे 1600 टक्क्यांनी वाढलेत. आता अ‍ॅक्सिटा कॉटननेही स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

अ‍ॅक्सिटा कॉटन कंपनीच्या बोर्डाने 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट जाहीर केले आहेत. याचा अर्थ गुंतवणूकदारांना एका इक्विटी शेअरसाठी 10 शेअर्स मिळतील आणि शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपयांवरून 1 रुपये असेल.

कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 21 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. त्याची सध्याची किंमत बीएसईवर 356.20 रुपये आहे. त्याची मार्केट कॅप 700.15 कोटी रुपये आहे.

अ‍ॅक्सिटा कॉटनचे शेअर्स गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. 11 जानेवारी 2019 रोजी त्याची किंमत 21.10 रुपये होती, जी आता 356.20 रुपये झाली आहे, म्हणजेच केवळ साडेतीन वर्षांत गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास 17 पटीने वाढले आहे.

तर या वर्षी 2022 मध्ये हा शेअर 323 टक्क्यांनी मजबूत झाला आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती चार पटीने वाढली आहे. त्याचवेळी, गेल्या एका वर्षात त्यात 754 टक्क्यांनी वाढ झाली आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 पटीने वाढ झाली आहे.

अ‍ॅक्सिटा कॉटन चांगल्या दर्जाचा कापूस बनवते आणि जगभरात विकते. कंपनी प्रामुख्याने शंकर-6 आणि MCU-5/MECH या जातीच्या कापसाचे उत्पादन करते. एप्रिल-जून 2022 मध्ये कंपनीला 4.45 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून 204.63 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market