बँकिंग क्षेत्राबद्दल 'एसबीआय'चे अध्यक्ष म्हणाले...

वृत्तसंस्था
Thursday, 2 January 2020

दूरसंचार क्षेत्र सध्या मोठ्या कर्जाशी झुंज देत आहे. गेल्या 14 वर्षांपासूनची महसुली थकबाकी आणि दंड मिळून ९२ हजार कोटी रुपये कंपन्यांना चुकते करावे लागणार आहे.

मुंबई : येत्या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या आर्थिक धोरणांबरोबरच क्षेत्रनिहाय (सेक्टरवाईज) भेडसावणाऱ्या समस्यांवर देखील सरकारला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असे स्टेट बँकेचे (एसबीआय) अध्यक्ष रजनीश कुमार यांनी  सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याचबरोबर संकटात सापडलेल्या बांधकाम, दूरसंचार आणि ऊर्जा क्षेत्राला देखील सरकारकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र बँकिंगसाठी चालू वर्ष सकारात्मक ठरणार आहे. 

- मिस्त्रींमुळे 'टाटा सन्स'ला बाधा? टाटा-मिस्त्री वाद अखेर सर्वोच्च न्यायालयात!

देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात मौद्रिक आणि वित्तीय धोरणे आखली जातील. त्यामुळे मागणी वाढून अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. मात्र, त्याचबरोबर विविध वित्तीय क्षेत्रांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पाऊले उचलली जाणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

- मोठी बातमी : ‘जीएसटी’च्या परताव्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक

रिअल इस्टेट क्षेत्रासाठी सरकारने रिअल इस्टेट फंडाची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे दूरसंचार क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. दूरसंचार क्षेत्र सध्या मोठ्या कर्जाशी झुंज देत आहे. गेल्या 14 वर्षांपासूनची महसुली थकबाकी आणि दंड मिळून ९२ हजार कोटी रुपये कंपन्यांना चुकते करावे लागणार आहे. मात्र बँकिंग क्षेत्रासाठी थकीत कर्जाच्या (एनपीए) वसुलीसाठी वर्ष 2020 चांगले असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- नव्या वर्षात पाकिस्तानला दणका; महागाईने गाठला कळस

'एस्सार स्टील'सारख्या मोठ्या कंपन्यांकडून यावर्षात थकबाकी वसुलीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचबरोबर इतर कंपन्यांकडून देखील कर्जाची परतफेड अपेक्षित असल्याने बँकांसाठी वर्ष सकारात्मक राहण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2020 will be best year for NPA recovery says SBI chairman Rajnish Kumar