नव्या वर्षात पाकिस्तानला दणका; महागाईने गाठला कळस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

  • अत्यावश्‍यक वस्तूंच्या किमती भडकल्या

इस्लामाबाद : नव्या वर्षात पाकिस्तानच्या नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. देशावर वाढते कर्ज आणि आर्थिक ताणाताणीमुळे दैनंदिन गरजा भागवणाऱ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाकिस्तान सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात महागाई 20 टक्‍क्‍यांनी वाढली असून, सामान्य नागरिकांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. पेट्रोल, डिझेल आणि आता स्वयंपाकाचा गॅस महागला आहे. पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडरची किंमत भारतीय रुपयांत 1513. 69 वरून सुमारे 2000 इतकी झाली आहे.

लोकपालाच्या नावाखाली कोट्यवधींचा भुर्दंड

पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये 11.8 किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या भावात अचानक 478 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे एका सिलिंडरला आता 1513.69 ऐवजी 1991.48 रुपये मोजावे लागणार आहे. याशिवाय केरोसिनचा भावात 3.10 रुपये प्रतिलिटर वाढ झाली आहे. त्याचवेळी पेट्रोलच्या भावात 2.61 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा भाव 116.60 पैसे प्रतिलिटर आहे.

भारतात मात्र पेट्रोलचा भाव लिटरमागे सरासरी 80 रुपये आहे. याशिवाय पाकिस्तानात डिझेलच्या भावात 3.10 पैशांनी वाढ झाली असून, त्यानुसार डिझेलचा भाव 127.26 पैसे प्रतिलिटर इतका झाला आहे. सध्या भारताच्या शंभर रुपयांसाठी पाकिस्तानचे 217 रुपये मोजावे लागतात, तर अमेरिकेच्या एका डॉलरला पाकिस्तानच्या 155 रुपये असा दर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inflation increases in pakistan in new year