
जर तुम्हालाही कर अर्थात टॅक्स वाचवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आतापासून बचत आणि गुंतवणूक करावी लागेल.
2022 मध्ये टॅक्स वाचवायचा आहे? Tax Savingसाठी सर्वोत्तम स्किम्स
Investment schemes for tax saving : नव वर्ष आता अगदी तोंडावर आला आहे. नवे संकल्प, नवी ध्येय नक्कीच खुणावत असतील. त्यात अनेकांना चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवडते. जर तुम्हालाही कर अर्थात टॅक्स (Tax) वाचवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आतापासून बचत आणि गुंतवणूक (Investment) करावी लागेल.
सरकारच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करून कर कपात कमी केली जाऊ शकते. NSC, सुकन्या समृद्धी योजना (SSY), PPF, NPS इत्यादी लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकता तसेच बचत करू शकता.
हेही वाचा: SBI ची टॅक्स सेव्हिंग स्कीम! 50 हजारांचे 26 लाख करण्याची सुवर्ण संधी
पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF)
आयकर वाचवण्यासाठी पीपीएफ (PPF) ही सर्वोत्तम सरकारी योजना मानली जाते. यामध्ये तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक (Investment) करू शकता. सध्या सरकार पीपीएफवर 7.10 टक्के वार्षिक व्याज देत आहे. ज्यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे.
नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS)
NPS ही सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. यामध्ये 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची बचत करण्यासोबतच 50,000 रुपयांपर्यंतचा फायदा घेता येईल. म्हणजेच NPS मध्ये गुंतवणूक करून तुम्ही एकूण 2 लाख रुपयांची आयकर सूट घेऊ शकता. तुम्ही यामध्ये महिन्याला रु. 1,000 पासून गुंतवणूक सुरू करू शकता.
हेही वाचा: भाड्याच्या घरात राहताय? 'इन्कम टॅक्स रिटर्न्स' वर मिळणार सवलत
टॅक्स सेव्हिंग एफडी (Tax Saving FD)
टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आयकर वाचवू शकता. त्याचा लॉक इन पिरियड 5 वर्षांचा आहे. टॅक्स सेव्हिंग एफडीचे व्याज दर वेळोवेळी बदलतात.
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS)
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा एक इक्विटी फंड आहे. हा एकमेव म्युच्युअल फंड आहे ज्यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. ELSS मध्ये वार्षिक 1 लाखापर्यंतचा परतावा/नफा करपात्र नाही. ELSS मध्ये सर्वात कमी लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा आहे, जो सर्व कर बचत गुंतवणूक पर्यायांपैकी सर्वोत्तम आहे.
हेही वाचा: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा पक्का खबरी आहे PAN CARD, नंबर्स करतात सर्व पोलखोल
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
तुम्ही सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये खाते उघडूनही कर वाचवू शकता. यासाठी तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही एक छोटी बचत योजना आहे, जी मोदी सरकारने सुरू केली होती. सध्या त्यावर वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळत आहे.
सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम्स (SCSS)
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही चांगली बचत योजना आहे. SCSS खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. यामध्ये वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. सध्या त्यावर 7.4 टक्के वार्षिक दराने व्याज मिळते.
Web Title: 2022 Investment Schemes For Tax Saving
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..