SBI ची टॅक्स सेव्हिंग स्कीम! 50 हजारांचे 26 लाख करण्याची सुवर्ण संधी

SBI लाँग टर्म इक्विटी फंड मधील लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा आहे.
TAX
TAXesakal
Summary

गुंतवणूक करताना परताव्याच्या व्यतिरिक्त, कुठे कर वाचवता येईल हे सुद्धा बघणे गरजेचे आहे. बाजारात अशा अनेक स्किम्स आहेत, जिथे गुंतवणुकीवर कर सवलतीचाही लाभ मिळतो.

SBI म्युच्युअल फंडाची एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंड स्कीम, जिचा फायदा दुहेरी आहे.

लाँच झाल्यापासून रग्गड परतावा

SBI लाँग टर्म इक्विटी फंड मधील लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा आहे. पण या स्किमने लाँग टर्मच्या गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला आहे. हा फंड 31 मार्च 1993 रोजी सुरू करण्यात आला. लॉन्च झाल्यापासून, याने 16.50 टक्क्यांच्या CAGR वर परतावा दिला आहे. दुसरीकडे, जर आपण मागील 20 वर्षांचा विचार केला तर या योजनेचा परतावा 22 टक्के सीएजीआर आहे. 20 वर्षांत, याने गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 52 पट केले आहेत. म्हणजेच ज्यांनी 50 हजार रुपये गुंतवले होते, त्यांचे पैसे 20 वर्षात 26.5 लाखांच्या जवळपास पोहोचले आहेत.

फंडची आतापर्यंतची कामगिरी

20 वर्षातील परतावा: 22 टक्के CAGR

50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीची किंमत 26.5 लाख रुपये

500 रुपये मासिक एसआयपीची किंमत: 1 करोड रुपये

10 वर्षातील परतावा: 15टक्के

50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीची किंमत : 2 लाख रुपये

2500 रुपये मासिक एसआयपीची किंमत : 13 लाख रुपये

TAX
SBI कडून शेअर्सवरही मिळते 20 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

- कमीत कमी गुंतवणूक

मासिक एसआयपीची एकरकमी गुंतवणूक : 500 रुपये

कमीत कमी एसआयपी : 500 रुपये

लॉक इन पीरियड: 3 वर्ष

फंडची अधिक माहिती

कॅटेगिरी: ELSS

लॉन्च डेट: 31 मार्च, 1993

लॉन्चपासूनचा परतावा : 16.50 टक्के CAGR

बेंचमार्क: S&P BSE 500 TRI

एकूण असेट्स: 11,094 कोटी (31 ऑक्टोबर, 2021)

एक्सपेंस रेश्यो: 1.81 टक्के (31 ऑक्टोबर, 2021)

TAX
SBI च्या 'या' ग्राहकांना लाखोंचा फायदा... जाणून घ्या!

तुमचे पैसे कोणत्या शेअर्समध्ये गुंतवले जातात ?

एचडीएफसी लॉन्ग टर्म ऍडव्हांटेज फंडाच्या टॉप होल्डिंग्समध्ये आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एल अँड टी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, इन्फोसिस, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, सिप्ला, महिंद्रा अँड महिंद्रा आणि अंबुजा सिमेंट्स या गुंतवले जातात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com