"22 किमको'ची आय फ्लो  इलेक्‍ट्रीक स्कूटर सप्टेंबरमध्ये 

सकाळ न्युज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

तायवान येथील इलेक्‍ट्रीक स्कूटर उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या किमको या कंपनीसोबत "22 मोटर्स' या कंपनीशी करार झाला असून  बुधवारी या कंपनीची आय फ्लो ही इलेक्‍ट्रीक स्कूटर सादर करण्यात आली. 

नवी दिल्ली - तायवान येथील इलेक्‍ट्रीक स्कूटर उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या किमको या कंपनीसोबत "22 मोटर्स' या कंपनीशी करार झाला असून  बुधवारी या कंपनीची आय फ्लो ही इलेक्‍ट्रीक स्कूटर सादर करण्यात आली. 

हरियाना (भीवाडी) येथे 22 कॅमको उत्पादन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे किमकोचे अध्यक्ष एलेन को आणि 22 मोटर्सचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अध्यक्ष परवीन खर्ब यांनी सांगितले. आय फ्लो या इलेक्‍ट्रीक स्कूटरसोबत लाईक 200 आणि एक्‍स टाऊन एबीएस या स्कूटरचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. सप्टेंबरमध्ये या स्कूटर ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. 

एलेन को म्हणाले, ""भारतात पर्यावरणपूरक गाड्यानिर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. 22 किमको कंपनीने भारतीय बाजारपेठेतील गरज लक्षात घेऊन आय फ्लो ही इलेक्‍ट्रीक स्कूटर व अत्याधुनिक आयसीई तंत्रज्ञान असलेल्या लाईक 200 व एक्‍स टाऊन एबीएस या दोन मॅक्‍सी स्कूटर प्रकारातील गाड्या सादर केल्या आहेत. '' 

परवीन खर्ब म्हणाले, ""भारतात मजबूत इलेक्‍ट्रीक मोबिलिटी इकोसिस्टिम घडविण्यासाठी दृष्टीने पावले उचलली जात आहे. भारतात पर्यावरणपूरक गाड्यांची आवश्‍यकता लक्षात घेऊन 22 किमको कंपनीने पुढाकार घेतला आहे. या इलेक्‍ट्रीक दुचाकी ग्राहकांच्या पंसतीत नक्की उतरतील.'' 

पुण्यासह पाच शहरात उपलब्ध 
पुणे, कोलकता, बंगळूर आणि अहमदाबाद येथे या गाड्या उपलब्ध होणार आहेत. लवकरच देशभरात या गाड्याची डीलरशिप देण्यात येणार आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 KYMCO Debuts In India With Three New Scooters