पीएम केअर फंडासाठी ५० कोटी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

अल्पसंख्याक महिलांना मायक्रो क्रेडिटद्वारे उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपक्रमांमध्ये मदत करून चंद्रशेखर घोष यांनी २००१ मध्ये महिला सबलीकरण आणि दारिद्य्र निर्मूलनासाठी बंधन बॅंक सुरू केली आहे.

पुणे : अल्पसंख्याक महिलांना मायक्रो क्रेडिटद्वारे उत्पन्न मिळवून देणाऱ्या उपक्रमांमध्ये मदत करून चंद्रशेखर घोष यांनी २००१ मध्ये महिला सबलीकरण आणि दारिद्य्र निर्मूलनासाठी बंधन बॅंक सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी फायनान्शियल इन्क्‍लूजन ट्रस्ट (एफआयटी) आणि नॉर्थ- ईस्ट फायनान्शियल इन्क्‍लूजन ट्रस्ट (एनईएफआयटी) या ट्रस्टची स्थापना केली. २०१५ मध्ये बंधन बॅंक स्थापन झाल्यानंतर एफआयटी आणि एनईएफआयटीने बॅंकेच्या प्रवर्तकांची भूमिका स्वीकारली. साथीच्या पार्श्‍वभूमीवर सी. एस. घोष यांनी एफआयटी आणि एनईएफआयटी यांच्यासह गरजूंना अन्नपुरवठा करण्यासाठी पुढे आले आहेत. यासाठी, तिघांनी राज्य सरकारांना २५ कोटींचे योगदान दिले. आणखी २५,०१,००,००१ रुपये पीएम-केअर फंडात दिले आहेत. १००० रुपयांचा विचार केल्यास प्रत्येक कुटुंबाला  १५ दिवस अन्नधान्य मिळू शकते. एकूण योगदान बघता ५ लाखांहून अधिक कुटुंबांना मदत होईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Edited By - Kalyan Bhalerao


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 crore for PM Care Fund