ऑनलाइन बँकिंग फेल होण्याचं प्रमाण 8 बँकांमध्ये सर्वाधिक; निम्म्या आहेत सरकारी

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 21 November 2020

एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, सरकारी मालकिच्या बँकातील ग्राहकांना ऑनलाईन ट्रान्झँक्शन फेल होण्याचे प्रमाण अधिक आहे. तांत्रिकबाबीमुळे व्यवहार अपूर्ण राहण्याचा दर हा जवळपास 14.8 टक्के इतका आहे. यात बँक ऑफ इंडिया 4.2 टक्के तर स्टेट बँक ऑफ इंडिया 3.7 टक्के ट्रान्झँक्शन फेल झाली आहेत.

यंदाच्या फेस्टिवल हंगामात ऑनलाईन ट्रान्झँक्शनमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या व्यवहारामध्ये बँकांचा असक्षमताही समोर आली आहे. जवळपास 8 बँकांमधील ऑनलाईन व्यवहारात लोकांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर येतय. यातील निम्म्या बँका या सरकारी आहेत. 

नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया ( एनपीसीआय) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सातत्याने दुसऱ्या महिन्यात  टेक्निकल फेल्योर रेट (digital transaction decline rate) 3 टक्केहून अधिक नोंदवला गेलाय. बॅकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, 0.1 टक्के टेक्निकल फेल्योर रीयल टाइम फंड ट्रान्सफरसाठी चिंतेचा विषय असतो. एनपीसीआयच्या डेटानुसार पेटीएम पेमेंट बँक व्यवहारात 0.02 इतका सर्वात कमी फेल्योर रेट आहे. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

या 4 सरकारी बँकांची व्यवस्था अगदीच ढिसाळ 
एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, सरकारी मालकिच्या बँकातील ग्राहकांना ऑनलाईन ट्रान्झँक्शन फेल होण्याचे प्रमाण अधिक आहे. तांत्रिकबाबीमुळे व्यवहार अपूर्ण राहण्याचा दर हा जवळपास 14.8 टक्के इतका आहे. यात बँक ऑफ इंडिया 4.2 टक्के तर स्टेट बँक ऑफ इंडिया 3.7 टक्के ट्रान्झँक्शन फेल झाली आहेत.

सरकारी बँकापेक्षा खासगी बँका ठरल्या भारी

तांत्रिक अडचणीमुळे ट्रान्झँक्शन फेल होण्याच्या यादीत सरकारी बँकांच्या तुलनेत खासगी बँकाचे प्रमाणे कमी आहे.  एचडीएफसी बँक, एक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेत 1 टक्केपेक्षाही कमी  ट्रान्झँक्शन डिक्लाइन झालेत.   कोटक महिंद्रा बँकेतील 2.36  ट्रान्झँक्शन फेल झाली आहेत.   

NBT च्या वृत्तानुसार, यंदाच्या सिजनमध्ये रोख व्यवहारामध्ये (Cash Transaction) मोठी घट झाली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर  केवळ 25 टक्के व्यवहार हे रोखीनं झाले. मागील वर्षी रोखीच्या व्यवहाराची टक्केवारी 60-65 टक्के इतकी होती. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 23 ऑक्टोबर पर्यंत  26.19 लाख कोटी रुपयांचे चलन (करन्सी) लोकांच्या हातात आहे. ही रक्कम मार्चच्या तुलनेत 11.5 टक्के अधिक आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 banks suffer higher rate of failure in digital transactions