ऑगस्ट महिन्यात बँकेचे व्यवहार करताय? तर 'हे' दिवस टाळाच!

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

ऑगस्ट महिन्यात बँकेचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे महत्त्वाची. या महिन्यातील काही दिवस बँकेचे व्यवहार करू नका कारण या दिवशी बँका राहणार आहेत बंद. अनेक सण, राष्ट्रीय सुट्ट्या असल्याने विविध सरकारी आणि खासगी बँका बंद असणार आहेत.

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात बँकेचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे महत्त्वाची. या महिन्यातील काही दिवस बँकेचे व्यवहार करू नका कारण या दिवशी बँका राहणार आहेत बंद. अनेक सण, राष्ट्रीय सुट्ट्या असल्याने विविध सरकारी आणि खासगी बँका बंद असणार आहेत.

ऑगस्ट महिन्यात ईद, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्यदिवस यांसारख्या दिवसांमुळे बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात तब्बल 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांत ऑगस्ट महिन्यात सुट्टी असणार आहे. त्यामुळे या सुट्ट्यांपूर्वीच बँकेचे व्यवहार पूर्ण करावे, अन्यथा नियोजित कामांना वेळ लागण्याची शक्यता आहे.  

कोणत्या राज्यात कधी होणार बँका बंद?

- 3 ऑगस्टला हरियाली तीजमुळे पंजाब, चंडीगड आणि हरयाणामध्ये बँक बंद राहतील. 

- 12 ऑगस्टला ईद-उल-जुहाची (बकरी ईद) सुट्टी असणार आहे. 

- स्वातंत्र्य दिवस आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आहे. तेव्हाही बँका राहणार बंद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 days Holiday to Bank in August Month