Share Market : फोर्ब्स अँड कंपनीच्या स्टॉकचा 6 महिन्यांत 88 टक्के परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share

Share Market : फोर्ब्स अँड कंपनीच्या स्टॉकचा 6 महिन्यांत 88 टक्के परतावा

फोर्ब्स अँड कंपनीच्या (Forbes & Co) शेअर्सना बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. सोमवारी कंपनीने त्याच्या प्रिसिजन टूल्सच्या व्यवसायाचे डिमर्जर जाहीर केल्यापासून कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. कंपनीचा शेअर बुधवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 766.05 रुपयांवर पोहोचले. गेल्या दोन दिवसांत हा शेअर जवळपास 10 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 88 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे.

फोर्ब्स प्रिसिजन टूल्स अँड मशीन पार्ट्स लिमिटेड (FPTL) ही नवीन संस्था फोर्ब्स अँड कंपनीमधून तयार केली जाईल. डिमर्जरच्या या योजनेत कॅशचा विचार केला जाणार नसल्याचे कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: Viral Video : ऑनलाईन मागवला ड्रोन हाती आला बटाटा; पहा व्हिडीओ

डीमर्जरच्या क्रमाने, एफपीटीएलचे 10 इक्विटी शेअर्स फोर्ब्स अँड कंपनीच्या गुंतवणूकदारांना 10 रुपये फेस व्हॅल्यूच्या फुली पेडअप इक्विटी शेअरवर रेकॉर्ड तारखेला जारी केले जातील असे फोर्ब्स अँड कंपनीने सांगितले. डिमर्जरमुळे फोर्ब्स अँड कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल होणार नाही.

31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी, फोर्ब्सच्या प्रिसिजन टूल्स बिझनेसचा टर्नओवर 179.22 कोटी होता आणि कंपनीच्या एकूण टर्नओवरमध्ये 76.25 टक्के वाटा होता. डिमर्जर नंतर, फोर्ब्स अँड कंपनी, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, कोडिंग आणि मेडिकल डिव्हायसेज, रिअल इस्टेट याशिवाय सब्सिडियरीज, जॉइंट व्हेंचर्स आणि एसोसिएट्सच्या बिझनेसमध्ये असेल.

हेही वाचा: Recipe : घरीच बनवा बनारसी स्टाईलचा चहा; कसा तयार करायचा पहा..

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.