Viral Video : ऑनलाईन मागवला ड्रोन हाती आला बटाटा; पहा व्हिडीओ

एका तरूणाने ड्रोन कॅमेरा मागवला होता. पण, त्याच्या हाती बटाटे आलेत.
Viral Video : ऑनलाईन मागवला ड्रोन हाती आला बटाटा; पहा व्हिडीओ

ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर मागवलेली वस्तू ऑनलाइन वेगळी आणि प्रत्यक्षात वेगळी असणं, त्यात काही तरी त्रुटी असणं किंवा मागवली एखादी वस्तू आणि आलं काही भलतंच. हे सर्वकाही नवं नाही. तुम्हीसुद्धा ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुम्हालाही कधी ना कधी तरी असा अनुभव आलाच असेल. याचा खूप मनस्तापही होतो. वेबसाईटवर दाखवतात काय अन् घरी येतं काय. असाच एक चक्रावून टाकणारा प्रकार समोर आलाय. एका तरूणाने ड्रोन कॅमेरा मागवला होता. पण, त्याच्या हाती बटाटे आलेत. काय आहे हा प्रकार पाहुयात.

रिपोर्टनुसार, नालंदामधील चेतन कुमार या तरूणाने मिशो या ऑनलाईन शॉपिंग कंपनीवरून ‘डिजेआय’ कंपनीचा ड्रोन कॅमेरा मागवला होता. ज्यावेळी तो पार्सल घेऊन ते फोडून पाहीले तर त्यात बटाटे होते. हे पार्सल पाहुनच चेतनला शंका आली. ड्रोनची साईज आणि आलेल्या बॉक्सची साईज यात त्याला फरक जाणवला. तसेच, बॉक्स हातात घेतल्यावरच त्याला ते कमी वजनाचे असल्याचे लक्षात आले.

Viral Video : ऑनलाईन मागवला ड्रोन हाती आला बटाटा; पहा व्हिडीओ
Recipe : घरीच बनवा बनारसी स्टाईलचा चहा; कसा तयार करायचा पहा..

हे पार्सल त्याने स्वत: न उघडता डिलीव्हरी बॉयलाच उघडायला लावले. त्याने या घटनेचा व्हिडीओही केला आहे. त्यामुळे या तरूणाने ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यावर ऍक्शन घेत कंपनीने चेतनला पैसे परत करण्याची प्रोसेस सुरू केली आहे.

ऑनलाईन वेबसाईट्सद्वारे शॉपिंग करणं खूप जास्त सोपं जातं. वेबसाईट्सवर सतत कुठली ना कुठली ऑफर सुरू असते. त्यामुळे वस्तूंच्या किंमती कमी होतात. पण ऑनलाईनच्या नादात काही वेळा ग्राहकांची फसवणूकही केली जाते. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे एखादे पार्सल मागवताना आणि ते आल्यावर डिलीव्हरी बॉयसमोरच उघडून पहावे.

Viral Video : ऑनलाईन मागवला ड्रोन हाती आला बटाटा; पहा व्हिडीओ
खवखवणारा घसा, खोकल्यापासून मिळेल आराम; 'हे' पाच घरगुती उपाय ट्राय करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com