LPG सिलिंडर बुकिंगवर मिळतेय 75 रुपयांची सूट! कशी मिळवाल?

बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक करण्यावर ग्राहक 10 टक्के सूट घेऊ शकतात
LPG cylinder
LPG cylinderEsakal
Summary

बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक करण्यावर ग्राहक 10 टक्के सूट घेऊ शकतात

एकीकडे कोरोना (Corona) आणि दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एलपीजी सिलिंडरची बुकिंग (LPG Cylinder Booking) स्वस्तात करायची असेल, तर ही उत्तम ऑफर तुम्हाला मदत करेल. डिजिटल पेमेंट सुविधा प्रदान करणार्‍या बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपद्वारे (Bajaj Finserv App) एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर एक उत्तम आणि सवलत ऑफर (Discount Offer) आहे.

LPG cylinder
सर्वसामान्यांना दिलासा! LPG सिलिंडर झाला स्वस्त

बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक करण्यावर ग्राहक 10 टक्के (जास्तीत जास्त रु. 75) सूट घेऊ शकतात. हे अ‍ॅप बजाज फायनान्स लिमिटेडद्वारे (Bajaj Finance Ltd.)संचालित आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांनी बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपद्वारे गॅस बुक करताना प्रोमोकोड GAS75 लागू करणे आवश्यक आहे.

LPG cylinder
काय सांगता! LPG सिलिंडर 'असा' बुक केल्यास मिळणार तब्बल 700 रुपयांचा कॅशबॅक

असा मिळेल कॅशबॅक

- सर्वात पहिल्यांदा बजाज फिनसर्व्ह अ‍ॅप ओपन करा

- यानंतर, बिल आणि रिचार्ज सेक्शनमध्ये, View All वर क्लिक करा.

- आता LPG GAS Cylinder चा पर्याय Utility & Bill मध्ये दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

- आता सर्व्हिस प्रोवायडरची निवड करावी लागेल. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ग्राहक क्रमांक टाकावा लागेल.

- तुमची बुकिंग रक्कम सिस्टीमद्वारे कळवली जाईल.

- आता Proceed To Pay वर क्लिक करा.

- यानंतर, Apply Promo Code च्या जागी, GAS75 टाइप करा. बुकिंग रकमेवर 10 टक्के सूट मिळेल.

- सध्या दिल्लीत 14.5 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. GAS75 कोड लागू केल्यानंतर, तुम्हाला गॅस बुकिंगसाठी 824.50 रुपये द्यावे लागतील. तुम्ही पेमेंट मोड म्हणून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग, बजाज फिनसर्व्ह वॉलेट किंवा UPI वापरू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com