केवळ 13500 रुपयांच्या गुंतवणुकीवर कोट्यधीश, पण आता तज्ज्ञ काय सल्ला देत आहेत जाणून घ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

केवळ 13500 रुपयांच्या गुंतवणुकीवर कोट्यधीश, पण आता तज्ज्ञ काय सल्ला देत आहेत जाणून घ्या...

मुंबई : केमिकल इंडस्ट्रीतील दिग्गज कंपनी दिपक नायट्रेटच्या (Deepak Nitrite) शेअर्समध्ये एका वेळी खूप वाढ दिसत होती, त्यांनी गुंतवणुकदारांना मजबूत परतावाही दिला आहे. पण गेल्या पाच दिवसांत त्यात सुमारे नऊ टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या हे शेअर्स 2119 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

अशात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीसाठी 1665 रुपयांचे टारगेट दिले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा 21 टक्के कमी आहे. त्यामुळेच ब्रोकरेजने यावर विक्रीचे रेटींग दिले आहे. दिपक नायट्रेटची मार्केट कॅप 28901.69 कोटी आहे.

दीपक नायट्रेटचे शेअर्स लाँगटर्ममध्ये गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरलेत. 15 नोव्हेंबर 2002 रोजी त्याची किंमत 2.83 रुपये होती, जी शुक्रवारी 2119 रुपयांवर पोहोचली. याचा अर्थ नोव्हेंबर 2002 मध्ये केवळ 13500 रुपये गुंतवले असते तर ते आज 1.01 कोटी रुपये झाले असते.

या वर्षी 18 जानेवारीला दीपक नायट्रेटचे शेअर्स 2690.05 रुपयांवर व्यवहार करत होते, जो एका वर्षातील उच्चांक आहे. पण, त्यानंतर, 1 जुलै 2022 पर्यंत, तो 37 टक्क्यांनी घसरून 1682.15 रुपयांवर आला, जो गेल्या 52 आठवड्यांतील विक्रमी नीचांकी आहे. नंतर तेजी आली आणि पुन्हा तो सुमारे 26 टक्के रिकव्हरी दिसून आली.

पुढे काय करायचे ?

कच्चा माल, युटिलिटीज आणि लॉजिस्टिक्सच्या जास्त किमतीमुळे कंपनीच्या मार्जिनवर दबाव येईल असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हटले आहे. याशिवाय, फिनॉल प्लांट पूर्ण क्षमतेने सुरु आहे, याचा अर्थ कंपनीची वाढ सध्या मर्यादित आहे.

कंपनीचा शेअर सध्या 20 पट म्हणजे 20x Fy24e Eps वर ट्रेड करत आहे. त्यामुळे, देशांतर्गत ब्रोकरेजने 1,665 रुपयांच्या टारगेटसह विक्रीचे रेटिंग कायम ठेवले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketInvestment