अदानी विल्मर IPO 27 जानेवारीला येणार, कमाईची संधी

 Adani Wilmer IPO News
Adani Wilmer IPO NewsSakal
Updated on

Adani Wilmar IPO: तुम्हीही प्रायमरी मार्केटमध्ये पैसे गुंतवून पैसे कमवण्याचा विचार करत असाल, तर पुढच्या आठवड्यात तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 2022 वर्षाचा दुसरा आयपीओ (IPO) 27 जानेवारीला उघडणार आहे. अदानी ग्रुपची कंपनी अदानी विल्मरचा (Adani Wilmar) आयपीओ (IPO) 27 जानेवारीला येतो आहे. हा आयपीओ 3600 कोटी रुपयांचा आहे. तुम्ही 31 जानेवारीपर्यंत यात गुंतवणूक करू शकता. अदानी विल्मर फॉर्च्युन कंपनी खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांचे उत्पादन करते.(Adani Wilmer IPO News)

3600 कोटींचा इश्यू

अदानी विल्मरच्या (Adani Wilmar) आयपीओमध्ये, (IPO) 1 रुपायाच्या फेस व्हॅल्युवर 3600 कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. यात ऑफर फॉर सेल (OFS) असणार नाही. याआधी आयपीओची साईज 4500 कोटी रुपये ठेवली होता, मात्र नंतर ती 3600 कोटी रुपये करण्यात आला. बाजारात लिस्ट होणारी अदानी समूहाची ही 7वी कंपनी असेल.

 Adani Wilmer IPO News
टाटा समूहाचा 'हा' स्टॉक स्वस्त, खरेदी करण्याची उत्तम संधी, तज्ज्ञांचा सल्ला

प्राइस बँड आणि लॉट साइज (Price Band & Lot Size)


Adani Wilmar ने IPO साठी 218-230 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केली आहे. कंपनीचे व्हॅल्युएशन 26287 कोटी रुपये आहे. अदानी ग्रुप आणि सिंगापूरस्थित विल्मर ग्रुपकडे अदानी विल्मारमध्ये 50—50 टक्के हिस्सा आहे. कंपनीने लॉट साइज 65 शेअर्सचा ठेवला आहे. म्हणजे त्यात किमान 14,950 रुपये गुंतवावे लागतील. त्याच वेळी, जास्तीत जास्त 194,350 रुपये गुंतवता येतील. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 107 कोटी रुपयांचे शेअर्स राखून ठेवले आहेत. त्यांना बोलीमध्ये प्रति शेअर 21 रुपये सूट मिळेल.

 Adani Wilmer IPO News
शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी पडझड, आजचे टॉप 10 कोणते?

कोणासाठी किती राखीव जागा ?


अदानी विल्मरने (Adani Wilmar) आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Investors) 50 टक्के हिस्सा राखून ठेवला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (non Institutional Investors) 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) 35 टक्के राखीव ठेवण्यात आले आहेत. कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन इंडिया, BofA सिक्युरिटीज इंडिया, क्रेडिट सुईस सिक्युरिटीज (इंडिया), ICICI सिक्युरिटीज, HDFC बँक आणि BNP पारिबा या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर असतील.

निधीचा वापर कसा होणार ?


DRHP नुसार, अदानी विल्मर कंपनी भांडवली खर्च म्हणून 1900 कोटी रुपये खर्च करेल. 1059 कोटी रुपये कर्ज भागवण्यासाठी खर्च करेल, तर 450 कोटी रुपयांनी धोरणात्मक कामासाठी वापरणार आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com