शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी पडझड, आजचे टॉप 10 कोणते?

Share Market
Share Marketsakal media

विकली एक्सपायरीदिवशी बाजारात प्रॉफिट बुकींग दिसून आली. सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 634 अंकांनी घसरून 59,465 वर बंद झाला तर निफ्टी 181 अंकांनी घसरून 17,757 वर बंद झाला. बँक निफ्टी 191 अंकांनी घसरला आणि 37,851 वर बंद झाला.

गुरूवारी आयटी आणि फार्मा शेअर्सने सर्वाधिक विक्री केली तर ऑटो, एफएमसीजी आणि ऑइल-गॅस शेअर्सने दबाव निर्माण केला. मात्र, घसरणीच्या काळातही पॉवर, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये खरेदी झाली. दुसरीकडे साखर आणि शिक्षणाशी संबंधित शेअर्समध्ये चांगली डिमांड राहिली.

सेन्सेक्सच्या 30 पैकी 22 शेअर्सची विक्री झाली, तर निफ्टीच्या 50 पैकी 35 शेअर्सनेमध्ये घसरण झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 8 शेअर्समध्ये घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी कमजोर होऊन 74.50 वर बंद झाला.

बाजार सलग तिसऱ्या दिवशी दबावाखाली राहिला आणि सुमारे 1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. सुरुवातीपासूनच, कमजोर जागतिक संकेतांमुळे बाजारात खराब वातावरण होते असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. दिवस संपता संपता कमजोरी अधिक वाढत गेल्याचे दिसून आले. मात्र, व्यवहाराच्या शेवटच्या तासात थोडी रिकव्हरी झाल्याचेही ते म्हणाले. गुरूवारी जवळपास सर्वच सेक्टर्स लाल चिन्हाने अर्थात घसरणीसह बंद झाली. यामध्येही आयटी, एफएमसीजी, बँकिंग आणि फार्मा हे टॉप लूजर राहिल्याचे त्यांनी सांगितले.

Share Market
Corona Virus : मास्कपासून मुक्ती कधी?

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर बियारीश कँडल तयार केल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. जोपर्यंत निफ्टी 17,850 च्या खाली राहील तोपर्यंत कमजोरीची शक्यता असेल आणि तो 17650-17500 च्या खाली असलेल्या पातळीवरही जाऊ शकेल. वरच्या बाजूला, निफ्टीसाठी 18,081 वर रझिस्टेंस दिसत असल्याचे ते म्हणाले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी संपूर्ण ट्रेडिंग सत्रात 100EMA च्या खाली राहिला, जे नजीकच्या काळात कमजोरीचे लक्षण असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. जोपर्यंत निफ्टी 17900 च्या खाली राहील तोपर्यंत तो कमजोर राहील. खाली 17,610 च्या दिशेने सपोर्ट दिसत असल्याचे ते म्हणाले.

Share Market
दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

आजच्या टॉप 10 शेअर्सची लिस्ट

पॉवर ग्रीड (POWERGRID)

भारती एअरटेल (BHARTIARTL)

ग्रासिम (GRASIM)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड (SRTRANSFIN)

ॲस्ट्रल (ASTRAL)

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

बाटा इंडिया (BATAINDIA)

टोरंट पॉवर (TORNTPOWER)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com